Video : तू माझा सांगातीच्या 'आवली' स समाजभुषण पुरस्कार

Video : तू माझा सांगातीच्या 'आवली' स समाजभुषण पुरस्कार

लोणंद (जि. सातारा)  : अंदोरी (ता. खंडाळा) येथील महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने संत शिरोमणी सावतामहाराज तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त देण्यात येणारा सन 2019 चा राज्यस्तरीय महात्मा फुले समता समाजभूषण पुरस्कार अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या प्रमिती नरके यांना जाहीर झाला आहे.

हेही वाचा : चलो, बॅग उठाओ और निकल पडो
 
रविवारी (ता. 5) सायंकाळी सात वाजता आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते आणि नीरा येथील समता सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीपदादा फरांदे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
 
अंदोरी येथील महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, शेती, उद्योग आदी क्षेत्रामध्ये समाजहित डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले समता समाजभूषण पुरस्कार देऊन दर वर्षी सन्मानित करण्यात येते. फुले दांपत्याचे विचार अभिनयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रामाणिक काम केल्याबद्दल संत तुकाराम मालिकेतील अवलीफेम अभिनेत्री प्रमिती नरके यांना यंदाचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नक्की वाचा :  कोसळलेलं आयुष्य पेलताना..!

सामाजिक कायकर्ते दशरथ फुले, श्रमजीवी सामाजिक संघटनेचे बाळासाहेब कोळेकर, पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर, विचारवंत हरी नरके, कामधेनू सेवा परिवाराचे डॉ. लक्ष्मणराव आसबे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा :  थांबायचे नाय आता थांबायचे नाय ; शिवरायांच्या मावळ्यांचा निर्धार

या वेळी अभिनेत्री प्रमिती नरके यांचे "अभिनेत्री घडत असताना' या विषयावर व्याख्यान होणार आहे. तत्पूर्वी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची गावातून सजवलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.


'आवली' ठरली लाेकप्रिय

प्रमिती नरके या मुळच्या पुण्याच्या आहेत. नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या प्रमितीने काही हिंदी नाटकांमध्ये आणि लघुपटांमध्ये काम केलं आहे. तू माझा सांगाती या मालिकेतील आवली या भुमिकेने प्रमितीस माेठी लोकप्रियता मिळाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com