सांबरशिंगप्रकरणी चौघांना दोन दिवस पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

सांगली - सांबरशिंग तस्करीप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांना आज न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा चौघांची कोठडी १९ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. तर दोघांची जामिनावर मुक्तता झाली.

सांगली - सांबरशिंग तस्करीप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांना आज न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा चौघांची कोठडी १९ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. तर दोघांची जामिनावर मुक्तता झाली.

सांबरशिंग विक्रीसाठी घेऊन निघालेल्या कृष्णा मोहिते (कसबे डिग्रज), महेश राव (शिंदे मळा, सांगली), चंद्रकांत कांबळे (नेज, ता. हातकणंगले), अतुल बाबासाहेब कल्याणी (रुकडी, ता. हातकणंगले) या चौघांना आठ दिवसांपूर्वी अटक केली होती. सांबरशिंग, मोटार, चाकू, पाच मोबाईल असा १३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीनंतर इस्लामपूर तहसीलमधील लिपीक दत्तात्रय मोटे (विश्रामबाग, सांगली) व सिद्राम अंगडगिरी (कर्नाळ रस्ता, सांगली) याला अटक केली. 

टोळीची पोलिस कोठडीत रवानगी केल्यानंतर पोलिसांनी तपासात काल (ता. १६) आणखी एक सांबरशिंग जप्त केले. अटकेतील सहा जणांना आज न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी वकील के. व्ही. चौरे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार मोहिते, राव, कल्याणी, अंगडगिरी या चौघांना १९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे तपास करत आहेत.

शिंग मोडलेले
पोलिसांनी दुसऱ्यांदा जप्त केलेले २ लाख रुपये किमतीचे सांबरशिंग मोडलेले असल्याचे तपासात निदर्शनास आले. त्यामुळे ते कोठे आहे? तसेच जप्त केलेली शिंगे कोठून आणली? याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली आहे.

Web Title: Sambar horn case