सांगली बुडाली, भिडे गुरुजी सापडले

टीम ई-सकाळ
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर आला आहे. त्यामुळे सांगलीतील संभाजी भिडे कुठं आहेत, असा सवाल करण्यात येत होता. मात्र, ते आता सापडले असून, उद्या (रविवार) त्यांचे कल्याणला व्याख्यान होणार आहे. 

पुणे : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर आला आहे. त्यामुळे सांगलीतील संभाजी भिडे कुठं आहेत, असा सवाल करण्यात येत होता. मात्र, ते आता सापडले असून, उद्या (रविवार) त्यांचे कल्याणला व्याख्यान होणार आहे. 

राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता संभाजी भिडे हे सध्या कुठं आहेत, अशा स्वरुपाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज (शनिवार) केले होते. त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे पत्रकच प्रसिद्ध झाले आहे. 

No photo description available.

'32 मण सुवर्ण सिंहासन व खडा पहारा' या विषयावर संभाजी भिडे यांचे उद्या साडेपाच वाजता कल्याणला व्याख्यान होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Bhide Found Speech of will be on 11th August