संभाजी भिडे यांच्याकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी विविध आरोपांनी राज्यभर चर्चेत आलेले शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी आज महामानव डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वसंतदादा साखर कारखाना चौकात येऊन अभिवादन केले. 

सांगली : कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी विविध आरोपांनी राज्यभर चर्चेत आलेले शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी आज महामानव डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वसंतदादा साखर कारखाना चौकात येऊन अभिवादन केले. 

कोरेगाव भीमा येथील हिंसाचारानंतर राज्यभर मोर्चे निघाले. शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्यावर आरोप झाले. तसेच भिडे यांच्या सन्मानार्थ सांगलीत नुकताच भव्य मोर्चाही निघाला. भिडे यांनी आज डॉ. आंबेडकर जयंतीदिनी येथील वसंतदादा साखर कारखान्यासमोरील चौकात उपस्थिती दर्शवली. साखर कारखाना फ्रेंडस्‌ सर्कल आणि इतरांनी आंबेडकर जयंतीनिमित्त मंडप उभारला. भिडे यांनी शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून आदरांजली वाहिली. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले, अक्षय पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Web Title: Sambhaji Bhide Remember of Dr Babasaheb Ambedkar