संभाजी भिडे म्हणतात... गांधीबाधा हा देशाला झालेला रोग

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

सांगलीत  'सीएए तो झांकी है..पाकिस्तान अभी बाकी है', 'जय भवानी-जय शिवाजी' अशा जोरदार घोषणा देत मोर्चास सुरवात झाली.

सांगली  : देशातील इंग्रजांचे राज्य घालवण्यासाठी क्रांतिकारकांनी देशाला स्वतंत्र देण्यासाठी आयुष्याचा उदंड होम केला. परंतू शेवटी गोष्ट अशी आमच्या देशाला स्वातंत्र्य 'पूज्य' महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामुळेच मिळाले. हा जो गांधीबाधा झालेला रोग देशाला लागला आहे. म्लेच्छ बाधा, आंग्ल बांधा आणि गांधीबाधा नामशेष करणारा मंत्र छत्रपती 
शिवाजी आणि संभाजी महाराज आहे. हा बीजमंत्र हिंदूच्या तांबड्या-पांढऱ्यापेशीत आणि मेंदूत भिनला पाहिजे असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी येथे केले.

शिवप्रतिष्ठानच्यावतीने 'सीएए' आणि 'एनआरसी' कायद्याच्या समर्थनार्थ आज हजारोंच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. राममंदिर येथे मोर्चास सुरवात झाली. 'सीएए तो झांकी है..पाकिस्तान अभी बाकी है', 'जय भवानी-जय शिवाजी' 
अशा जोरदार घोषणा देत मोर्चास सुरवात झाली. मोर्चाच्या प्रारंभी महिला कार्यकर्त्या सहभागी होत्या. कॉंग्रेस भवन, स्टेशन रस्ता, राजवाडा चौकमार्गे मारूती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आला. तेव्हा सभेत रूपांतर झाले.

हेही वाचा ....पाकिस्तान अभी बाकी है

देशात हरामखोरांना आश्रय देणे शहाणपणाचे नाही

श्री. भिडे म्हणाले, 'सीएए आणि एनआरसी कायदा हा देशहिताचा आहे. परंतू या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढावे लागतात हेच दुर्भाग्य म्हणावे लागेल. कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आणि इरसाल, हरामखोर आहेत. हा
 कायदा यापूर्वीच व्हायला हवा होता. देशात हरामखोरांना आश्रय देणे शहाणपणाचे नाही. हिंदुस्थानच्या प्रकृतीत एक दोष आहे. तो शेकडो वर्षाचा आहे. हिंदू माणसाला आत्मोद्धार करतो. परंतू राष्ट्रोध्दार,राष्ट्रसाक्षात्कार कळत नाही. व्यक्तीगत पातळीवर हिंदू माणूस जगात तोड मिळणार नाही इतका चांगला आहे. परंतू राष्ट्र, समाज आणि धर्म पातळीवर तो पराभूत असलेला आहे. 

क्लिक करा - सतेज पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी
 

तीन बाधा या समाजाला झाल्या

जगातील 86 राष्ट्रांनी आक्रमण केले. आपला कोण, मित्र 
कोण आणि शत्रू कोण हे हिंदूना कळत नाही. हिंदूच्या रक्तातला हा दोष घालवायचा असेल तर देशामध्ये 123 कोटी पसरलेल्या समाजात छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज मंत्र बिंबवला पाहिजे. 'ते पुढे म्हणाले, 'देशभक्ती, स्वातंत्र्य भक्तीतील कमजोरी, नंपुसकत्व आणि वंधत्व हिंदू समाजात अपार आहे. गेल्या हजार-बाराशे वर्षात तीन बाधा या समाजाला झाल्या आहेत. 

 तिन्ही बाधा नामशेष करायच्या असतील तर...

पहिली बाधा म्हणजे दिल्लीवर मुस्लिमांचे राज्य होते. त्यामुळे म्लेच्छ बाधा रक्तात आहे. त्यानंतर इंग्रज आले. त्यामुळे आंग्ल बांधा आपल्या रक्तात आली आहे. तिसरी बाधा म्हणजे गांधीबाधा आहे.गांधीबाधा हा देशाला झालेला रोग आहे. या तिन्ही बाधा नामशेष करायच्या असेल तर छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज हाच बीजमंत्र आहे. तो
 सर्वांमध्ये भिनण्यासाठी शिवप्रतिष्ठान कार्यरत आहे.'
मोर्चाच्या प्रारंभी कणेरी मठाचे काडसिद्धेश्‍वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच समारोप प्रसंगी शिवयोगी शिवाचार्य महाराज, शिवदेवस्वामी, हितेश्‍वर स्वामी, आत्माराम स्वामी, योगीनंद महाराज, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ , आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत आदीं सहभाजपचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Bhide Spach Shivpratishthan March Sangli Martahi News