छत्रपतींची बदनामी खपवून घेणार नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

सांगली - छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी खपवून घेणार नाही. पुण्यातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील नाटककार राम गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला. त्यांचे आम्ही समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, महेश घारगे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. 

ते म्हणाले, ""राम गडकरी हे इतिहास संशोधक नव्हते, इतिहासकारही नव्हते तर ते एक नाटककार होते. नाटके म्हणजे इतिहास नाही. स्वतःच्या लेखणीचा, कौशल्याचा आणि विकृत बुद्धिमत्तेचा वापर करून छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे तसेच संपूर्ण छत्रपती घराणे आणि शिवरायांशी निगडित गोष्टींची "राजसंन्यास' नावाचे काल्पनिक नाटक रचून त्यांनी बदनामी केली. तरीही गडकरींच्या नाटकाला आणि त्यातील काल्पनिक इतिहासाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी त्याच्या जातभाईंनी सातत्याने त्याचा उदोउदो केला. एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी राम गणेश गडकरी नावाच्या नाटककाराला आमच्या डोक्‍यावर बसवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीच गडकरींच्या 43 व्या पुण्यतिथीच्या दिवशी 23 जानेवारी 1962 रोजी प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते आणि पुणे मनपाचे नगरशासक सदाशिव बाळकृष्ण कुलकर्णी व महापौर शिवाजीराव अमृतराव ढेरे यांच्या उपस्थितीत गडकरींचा पुतळा छत्रपती संभाजी उद्यानात बसवला होता. ज्या छत्रपती शंभुराजेंची बदनामी गडकरींनी केली त्याच शंभुराजांच्या नावाने असणाऱ्या छत्रपती संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा उभा करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होता. त्यामुळेच संभाजी ब्रिगेडला हा पुतळा हलवण्याचे पाऊल उचलावे लागले.'' 

विजय पाटील, सुधीर नाईक, प्रणव भोसले, हरिप्रसाद पवार, गणेश काळे आदी उपस्थित होते.

Web Title: sambhaji brigae press conference