लवकरच संभाजी तलाव सुशोभीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया

परशुराम कोकणे
गुरुवार, 19 जुलै 2018

संभाजी तलाव सुशोभीकरणाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच सुरवात होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. जलपर्णी, ड्रेनेजचे पाणी थांबविण्यासाठी महापालिका काम करणार आहे. पर्यटन महामंडळ सुशोभीकरणाच्या अनुषंगाने काम करणार आहोत. 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

सोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाकडून चार कोटी 92 लाख रुपये मंजूर झाले आहेत. सुशोभीकरणाच्या कामासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. 

संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने चार कोटी 92 लाखांचा निधी मंजूर केला असून सुशोभीकरणाची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यात अनेक ठिकाणी तलाव सुशोभीकरणाच्या अनुषंगाने कामे केली आहेत. सुरवातीच्या टप्प्यात संभाजी तलावास कंपाउंड करण्यात येणार आहे. परिसरात पथदिवे बसविण्यात येतील. गणेश विसर्जनाच्या ठिकाणी रॅम्प करण्यात येणार आहे. झाशीच्या राणीच्या पुतळा परिसरातील बाग अधिक सुंदर करण्यात येईल. खेळणीही नव्याने बसविण्यात येतील असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. संभाजी तलाव प्रदूषण मुक्त करून सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी "सकाळ' सातत्याने पाठपुरावा करत आहे. "सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. 

संभाजी तलाव सुशोभीकरणाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच सुरवात होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. जलपर्णी, ड्रेनेजचे पाणी थांबविण्यासाठी महापालिका काम करणार आहे. पर्यटन महामंडळ सुशोभीकरणाच्या अनुषंगाने काम करणार आहोत. 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

Web Title: sambhaji lake in Solapur