राष्ट्रवादीमध्ये सनातन्यांची घुसघोरी- आंबेडकर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. एमआयएमसोबत असलेली आघाडी तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना हा आरोप केला आहे.

पंढरपूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. एमआयएमसोबत असलेली आघाडी तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना हा आरोप केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले आहेत की, भीमा कोरेगाव दंगलीमध्ये सनातन्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे करावा असा असेही त्यांनी म्हटले आहे. एमआयएम सोबत आमची युती आहे. भिमा-कोरगांव प्रकरणात भिडेंना वाचवणारे राष्ट्रवादीत कोण आहेत ते आम्हाला माहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

काँग्रेसवर अंवलंबून राहण्याचा प्रश्नच येत नाही. आमची भूमिका लवकरच स्पष्ट करू. काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा लाढवाव्यत असेही आंबेडकरांनी काँग्रेस पक्षाला सुनावले आहे. ज्या वेळी युतीसाठी काँग्रेसकडे हात पुढे केला होता तेव्हा त्यांचे डोळे झाकलेले होते. एमआयएमचा हात पकडल्यानंतर आता काँग्रेसचे डोळे उघडले असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. तसेच सोलापूरमधून आपण निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Sanatans Entered in NCP Says Ambedkar Video