साताऱ्यात वाळूला आला सोन्याचा भाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या वाळूचा दर ब्रासला नऊ हजार रुपये असून, एक डंपर वाळूसाठी ३० ते ३२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या वाळूसाठी कोकणातील वाळूवर अवलंबून राहावे लागणार आहे.

यावर्षी पावसाळ्यानंतर वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे वाळूचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. याचा परिणाम बांधकामांवर झाला आहे. वाळू लिलावाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने लिलाव प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे पर्यावरण विभागाची परवानगी असूनही लिलाव घेता आलेले नाहीत.

परिणामी चोरटी वाळू वाहतूक सध्या सुरू आहे. त्यासाठीही ब्रासला नऊ हजार रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे घराचे बांधकाम करणारे तसेच बांधकाम व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. सध्या सातारा जिल्ह्यात रत्नागिरीवरून वाळू आणली जात आहे. तर स्थानिक ठिकाणची वाळू ही चोरट्या पध्दतीने पहाटेच्यावेळी दिली जात आहे. त्यासाठी एक डंपर किंवा ट्रक यामध्ये साधारण तीन, साडेतीन ते चार ब्रास वाळू बसते. त्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाढलेला दर लक्षात घेऊन घराच्या स्लॅबसाठीच वाळूचा वापर केला जात आहे. उर्वरित बांधकामासाठी दगडाची कच वापरली जात आहे. काही ठेकेदारांनी वाळूचा यापूर्वीच साठा करून ठेवला होता, त्याची आता चढ्या भावाने विक्री केली जात आहे. वाळूला पर्याय म्हणून दगडापासून बनविलेली बारीक कच वापरली जात आहे. तिचा दरही दोन ते अडीच हजार रुपये ब्रासपर्यंत जात आहे. उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने यावर्षी वाळू लिलाव होतील, याची शाश्‍वती नसल्याने बांधकाम व्यवसायिकांची अडचण झाली आहे.

कोकणातील वाळूवरच भिस्त
सातारा जिल्ह्यात वाळूचे लिलाव होणार नाहीत. पण कोकणात वाळू उपलब्ध असल्याने तेथून वाळू आणून विकण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्यासाठीही नऊ हजार रुपये ब्रासप्रमाणे दर घेतला जात आहे. सध्यातरी बांधकामासाठी कोकणातील वाळूवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Sand Rate Increase