वाळू तस्करीत मातीमिश्रितचा फंडा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

कलेढोण - पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय हरित लवादाने वाळू उपशास बंदी घातली असताना जिल्ह्यात महसूल विभागाने मातीमिश्रित वाळूचा नवा फंडा सुरू केला आहे. वाळू तस्कर शेतकऱ्यांना हाताला धरून ना हरकत परवानग्या घेत व अर्थपूर्ण तडजोडी करीत मातीमिश्रित वाळूच्या नावाखाली जोरदार वाळूउपसा करत आहेत. 

राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रातील वाळू उपशावर बंदी घातल्यामुळे वाळू उपशावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वाळूची मोठी टंचाई निर्माण झाली. सरकारी आणि खासगी कामांनाही वाळू उपलब्ध होत नाही. त्याचा बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ नये म्हणून पाच महिन्यांसाठी काही अटींवर वाळू लिलाव काढण्यास जिल्ह्यात परवानग्या देण्यात आल्या. 
वाळू प्रत्यक्षात नदी व ओढ्याच्या प्रवाहात तयार होत असताना शेतकऱ्यांच्या शेतातील मातीमिश्रित वाळू कागदावर दाखवून प्रत्यक्षात नदी व ओढ्यातील वाळूउपसा सुरू आहे. ठेकेदारांकडून प्रवाह मार्गातील वाळू ती जिल्हाबाहेर पाठवली जात आहे. 

खणीकर्म विभागाकडून १९ ठेक्‍यांचा लिलाव 
कोरड्या नद्यांमधील वाळूउपसा करण्यासाठी जिल्हा खणीकर्म विभागाने १९ वाळू ठेके लिलावात काढले. एका बाजूला वाळू लिलाव झाले असताना काही वाळू तस्करांवर महसूल विभाग प्रसन्न झालेला असून, विनानिविदा प्रस्ताव दाखल करत मातीमिश्रित वाळूच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करत उपशाच्या परवानग्या दिलेल्या आहेत. त्यात म्हसवड- दोन, विखळे- दोन, अंबवडे- एक, जावळी- एक, कऱ्हाड- आठ, सातारा- एक आदी ठिकाणांचा समावेश आहे. 

Web Title: sand smuggling soil mixing