मायणीच्या वाघबिळातून निघतंय काळं सोनं

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

कलेढोण - मायणीतील ब्रिटिशकालीन तलावात गेल्या चार वर्षांपासून पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे पूर्वेकडील वाघबीळ परिसरासह चितळी-शेडगेवाडी, मायणीतील शिंदेवाडा, कानकात्रे ओढ्यालगत वारंवार चोरटा वाळूउपसा सुरू असतो. त्यावर अंकुश म्हणून पोलिसांनी व महसूलने कारवाई करीत वाळू तस्करांच्या मुसक्‍या आवळल्या असल्या तरी मायणीच्या वाघबिळातून अधूनमधून काळं सोनं बाहेर निघत असल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात उपसाबंदी असल्यामुळे वाळूला सोन्याचे भाव आहेत. खटाव तालुक्‍यात येरळवाडीचे पात्र, नेर, वडूज, खटाव व औंध परिसरात चोरटा वाळूउपसा होतो. मायणीतील चितळी-शेडगेवाडी हद्द, कानकात्रे ओढा, वाघबीळ व शिंदेवाडा, विखळे-शिंदेवाडी ओढा आदी वाळू साठ्यांचा समावेश असतो. गत महिन्यात चितळीतील ग्रामस्थांनी वाळूची वाहतूक करणारी चोरटी वाहने पोलिसांना धरून दिली. तर मायणीतही पोलिसांनी काही वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमुळे मायणी पोलिस ठाणे, धान्य गोदाम परिसर कारवाई केलेल्या वाहनांनी गजबजला आहे. त्यात ट्रॅक्‍टर, टेंपो, छोटी पिक-अप व ट्रकचा समावेश आहे. उपसा बंदीमुळे वाळूला आलेला सोन्याचा भाव, झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग व कमी वयात हातात पैसा खेळण्याने या बेकायदेशीर व्यवसायाकडे तरुणांचा ओढा वाढत आहे. वाळू चोरीत कारवाईच्या भीतीने रस्त्यावरून धावणारी वाहने, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला लागून होणारा वाळूउपसा, प्रवाह मार्गात होणारा उपसा यामुळे ग्रामस्थ, वाहनचालक व शेतकरी त्रस्त आहेत.   

मायणीत नुकतीच पोलिसांनी वाळूची पाच वाहने ताब्यात घेतली. त्यात सांगली जिल्ह्यातील २० ते ३० वयातील पाच तरुणांचा समावेश असून त्यांच्याकडून सुमारे ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यंत्रणेची सतर्कता महत्त्वाची
वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे वाळू तस्करीच्या मुसक्‍या आवळल्या जात असल्या तरी, पोलिसी खाक्‍याला न जुमानता वाळू तस्कर चोरट्या पद्धतीने वाघबिळातील काळं सोनं बाहेर काढीत आहेत. त्यासाठी पोलिस यंत्रणा व महसूल विभागास आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.  

Web Title: Sand Theft Crime Police