संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळ यांना शिरूर येथून अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पसार दोन पसार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज सायंकाळी शिरूर येथून अटक केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पसार दोन पसार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज सायंकाळी शिरूर येथून अटक केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

आरोपी संदीप बाळासाहेब गिऱ्हे, पप्पू उर्फ महावीर रमेश मोकळे(दोघे रा. शाहुनगर, केडगाव) अशा ते आरोपींची नावे आहेत. केडगाव येथील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांचा शनिवारी सायंकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बीएम उर्फ भानुदास कोतकर, संदीप गुंजाळ, बाबासाहेब केदार यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याने हत्या करण्यात संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळ व अन्य एकाचा सहभाग असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके गिऱ्हे आणि मोकळे यांच्या शोधात होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहिती आज पथकाने शिरूर(ता. पुणे) येथे सापळा लावला होता. आज सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संदीप गिऱ्हे आणि पप्पू उर्फ महावीर मोकळ यांना पकडले. याबाबत रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली. 

दरम्यान, या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या आता सातवर जाऊन पोहोचली असून, गुन्ह्याचा कट नेमका कोठे आणि कुणी रचला याचा उलगडा होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Sandeep Gharhe Pappu Mokal arrested from Shirur