वनविहारानंतर आता स्मृती वन परिसरातही चंदन चोरी!

परशुराम कोकणे
रविवार, 20 मे 2018

वन विभाग, पोलिसासह पर्यावरणप्रेमींना आव्हान 
सिद्धेश्‍वर वन विहारातील चंदन चोरी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी 15 दिवसांपूर्वी उघडकीस आणली. त्यानंतरही सिद्धेश्‍वर वन विहारात सातत्याने झाडं तोडून चंदनाची चोरी सुरूच आहे. चोरट्यांना शोधण्यासाठी वन विभाग अपेक्षित प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. जैवविविधतेने नटलेल्या स्मृती वन उद्यान परिसरातील वृक्षमित्र बाबूराव पेठकर यांच्या शेतातील चोरट्यांना शोधून काढण्याचे आव्हान वन विभाग, पोलिस आणि पर्यावरण प्रेमींसमोर आहे.

सोलापूर : एकीकडे आपली वनसंपदा जपण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि पर्यावरणप्रेमी प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे आर्थिक फायद्यासाठी चंदनाची झाडं तोडून तस्करी केली जात आहेत. सिद्धेश्‍वर वनविहारानंतर आता संभाजी तलाव शेजारील स्मृती वन उद्यान परिसरातील वृक्षमित्र बाबूराव पेठकर यांच्या शेतातील पाच झाडं तोडून चंदनाची चोरी करण्यात आली आहे. 

सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर शासनाने बाबूराव पेठकर यांचा गौरव करत स्मृती वन उद्यान परिसरातील जमीन शेती करण्यासाठी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून श्री. पेठकर या ठिकाणी शेती करत असून याठिकाणी जल संवर्धनासह शेतीविषयक अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात आले. फेरफटका मारताना त्यांना शेतातील चंदनाची झाडं तोडल्याचे लक्षात आले. त्यांना धक्का बसला. झाडं तोडण्यासाठी कुऱ्हाड न वापरता मोटारीचा वापर करण्यात आला आहे. 

शेतातून यापूर्वी इलेक्‍ट्रॉनिक मोटार, किरकोळ साहित्याची चोरी झाली होती. आता कोणीतरी पाळत ठेवून शेतातील पाच चंदनाची झाड कापली आहेत. ही झाडं 20 ते 25 फुटांची होती. वन विभाग आणि पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा. 
- बाबूराव पेठकर, वृक्षमित्र 

वन विभाग, पोलिसासह पर्यावरणप्रेमींना आव्हान 
सिद्धेश्‍वर वन विहारातील चंदन चोरी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी 15 दिवसांपूर्वी उघडकीस आणली. त्यानंतरही सिद्धेश्‍वर वन विहारात सातत्याने झाडं तोडून चंदनाची चोरी सुरूच आहे. चोरट्यांना शोधण्यासाठी वन विभाग अपेक्षित प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. जैवविविधतेने नटलेल्या स्मृती वन उद्यान परिसरातील वृक्षमित्र बाबूराव पेठकर यांच्या शेतातील चोरट्यांना शोधून काढण्याचे आव्हान वन विभाग, पोलिस आणि पर्यावरण प्रेमींसमोर आहे.

Web Title: sandlewood thief in Solapur