सांगली - सुनकेंना लॉटरी; कबाडगे अपक्ष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सांगली : नेमिनाथनगर, चांदणी चौक परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग सतरामधील कॉंग्रेसमधील गोंधळ संगीता सुनके यांच्यासाठी फायद्याचा ठरला. तेथील इच्छुक बाहुबली कबाडगे यांना राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढतीसाठी एबी फॉर्म दिला होता, शिवाय पत्नी स्नेहा यांनाही उमेदवारी दिली होती. कबाडगे यांनी दोन्ही ऑफर नाकारत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून संगीता सुनके यांना लॉटरी लागली. 

बाहुबली स्वतः इच्छुक होते. तेथे राष्ट्रवादीने सर्वसाधारणच्या दोन जागांवर दिग्विजय सूर्यवंशी व धनंजय कुंडले यांना उमेदवारी दिली. कॉंग्रेसने बाहुबली यांना मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला. तो दिग्विजय यांच्याविरुद्ध होता, तो त्यांना नाकारला. पत्नी सोहा यांचा एबी फॉर्म निघाला, यादीत त्यांचे नावही आहे. परंतू, कबाडगे यांनी स्वतःच मैदानात उतरण्याचे ठरवत पत्नीचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे यादीतील दुसरे नाव असलेल्या सुनके यांना आपसुकच कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. बाहुबली यांनी या प्रभागातून कुंडले यांच्याविरुद्ध अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: sangali elections kabadge independent sunake

टॅग्स