Sangali: महाआघाडीला ‘कपबशी’, भाजपला ‘विमान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

सांगली : महाआघाडीला ‘कपबशी’, भाजपला ‘विमान’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. महाआघाडीच्या सहकार विकास पॅनेलला कपबशी, तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलला विमान चिन्ह देण्यात आले. तसेच इतर १२ उमेदवारांना अन्य चिन्हांचे वाटप आज करण्यात आले. चिन्ह वाटपानंतर उमेदवारांनी तत्काळ प्रचारास प्रारंभ केला आहे. मतदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटात खानापूरमधून आमदार अनिल बाबर, शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक, पलूसमधून महेंद्र लाड हे तीन विद्यमान संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. २१ पैकी तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरीत १८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. महाआघाडीच्या सहकार विकास पॅनेलचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर त्यांनी १८ जागांवर उमेदवार उभे केलेत. तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलचे १६ उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

आज चिन्ह वाटपवेळी शेतकरी विकास पॅनेलने विमान चिन्ह तर सहकार पॅनेलने कपबशी चिन्ह मागणीनुसार दिले. सहकार पॅनेलचे उमेदवार असे : सोसायटी गट : आटपाडी- तानाजी पाटील, कवठेमहांकाळ- अजितराव घोरपडे, जत- विक्रमसिंह सावंत, तासगाव- बी.एस. पाटील, मिरज- विशाल पाटील, वाळवा- दिलीप पाटील, कडेगाव- मोहनराव कदम, महिला राखीव- जयश्री पाटील, अनिता सगरे, अनुसूचित जाती- बाळासो होनमोरे, ओबीसी- मन्सूर खतीब, भटक्या जाती- ॲड. राजेंद्र डांगे, इतर शेती संस्था- वैभव शिंदे, प्रक्रिया संस्था- सुरेश पाटील, नागरी बँका व पतसंस्था- किरण लाड, पृथ्वीराज पाटील, मजूर संस्था- हणमंत देशमुख, सुनील ताटे.

शेतकरी विकास पॅनेल उमेदवार असे : सोसायटी गट : आटपाडी- राजेंद्र देशमुख, जत- प्रकाश जमदाडे, तासगाव- सुनील जाधव, मिरज- उमेश पाटील, वाळवा- भानुदास मोटे, कडेगाव- तुकाराम शिंदे, महिला- संगीता खोत, दीपाली पाटील, अनुसूचित जाती- रमेश साबळे, ओबीसी- तम्मनगौडा रवि, भटक्या जाती- परशुराम नागरगोजे, प्रक्रिया संस्था- चंद्रकात पाटील, नागरी बँक व पतसंस्था- अजित चव्हाण, राहुल महाडिक, मजूर संस्था- संग्राम देशमुख, सत्यजित देशमुख.

अन्य उमेदवारांमध्ये कवठेमहांकाळ गटात- विठ्ठल पाटील (चिन्ह छत्री), तासगाव- प्रताप पाटील (नारळ), अनुसूचित जाती- विलास बेले (सिलिंग फॅन), नितीन काळे (बॅट), कल्लू कामत (कॅमेरा), ओबीसी- मुजीर जांभळीकर (ऑटो रिक्षा), सुयोग सुतार (पतंग), भटक्या जाती- शंकर माने (जीपगाडी), इतर संस्था- शंकर पाटील (अंगठी), तानाजी पाटील (मशाल), बँका व पतसंस्था- किशोर पाटील (मोटारगाडी), मजूर संस्था- शंकर माने (जीपगाडी) याप्रमाणे चिन्ह वाटप झाले आहे.

loading image
go to top