संगमनेर ते पंढरपूर सहा मित्रांची पर्यावरणासाठी सायकलवारी

आदम पठाण
रविवार, 26 ऑगस्ट 2018

संगमनेर ते पंढरपूर अशी गेल्या चार वर्षापासून सायकलवारी करत असलेले संगमनेरचे सहा मित्र सायकल चालवून काय फायदे होतात व सायकलमुळे पर्यावरण कसे चांगले राहते, या बाबत लोकांमध्ये पर्यावरण बाबतचे महत्व पटवून देत असून सायकवारी मधून गेल्या चार वर्षापासून जनजागृतीचे काम करत असून ती परंपरा त्यांनी यावर्षी सुध्दा कायम ठेवली आहे. 

वडापुरी: संगमनेर ते पंढरपूर अशी गेल्या चार वर्षापासून सायकलवारी करत असलेले संगमनेरचे सहा मित्र सायकल चालवून काय फायदे होतात व सायकलमुळे पर्यावरण कसे चांगले राहते, या बाबत लोकांमध्ये पर्यावरण बाबतचे महत्व पटवून देत असून सायकवारी मधून गेल्या चार वर्षापासून जनजागृतीचे काम करत असून ती परंपरा त्यांनी यावर्षी सुध्दा कायम ठेवली आहे. 

यावेळी राजेंद्र गुंजाळ वय (65 वर्षे ) म्हणाले कि, सायकल चालविल्यानंतर स्वताचे आरोग्य चांगले राहते त्याचे, होणारे फायदे सुध्दा लोकांना कळावे यासाठी आम्ही गेल्या चार वर्षापासून या सायकलवारीचे आयोजन करत असतो. सायकल चालविल्यामुळे स्वताचे आरोग्य चांगले राहतेच परंतु दुसऱ्यांना सुद्धा प्रेरणा देण्याचे काम आम्ही या तीन दिवसाच्या सायकलवारीमधून करत असल्याचे गुंजाळ म्हणाले. 

संगमनेरवरुन अहमदनगर, दौंड, इंदापूर अकलूज पंढरपूर अशी सायकलवारी असून यामध्ये विकास देशमुख, निलेश वाघचौरे, आण्णासाहेब रहाणे, गणेश थोरात, राजेंद्र गुंजाळ, विजय ताजणे यांचा समावेश आहे.

Web Title: sangamner to Pandharpur cycling six friends for environment