आष्टा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी संगीता सूर्यवंशी

आष्टा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी संगीता सूर्यवंशी

आष्टा - नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विलासराव शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष तानाजीराव सूर्यवंशी यांच्या पत्नी संगीता सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकानी फटाक्‍यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. शहरातील प्रमुख मार्गावरून तीन तासाहून अधिक काळ मिरवणूक निघाली. पालिकेत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्वच समित्यांच्या सभापतीपदी महिलांना संधी मिळाल्याने पालिकेत प्रथमच महिलाराज उतरले. 

नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी पिठासनाधिकारी म्हणून काम पाहिले.पालिकेच्या सभागृहात निवडीचा कार्यक्रम झाला. 
निवडीनंतर मुख्याधिकारी हेमंत निकम, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, झुंजारराव पाटील, उपनगराध्यक्ष शैलेश सावंत, पक्षप्रतोद विशाल शिंदे, झुंजारराव शिंदे, रघुनाथ जाधव, बाबासाहेब सिद्ध, शेरणवाब देवळे यांच्या हस्ते सत्कार झाला. 

पी एल घस्ते यानी मुदत संपल्याने पदाचा राजीनामा दिला होता. नव्याने आज निवडीचा कार्यक्रम झाला. उपनगराध्यक्ष पदासाठी संगीता सुर्यांवशी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. एकमेव अर्ज असल्याने पिठासनाधिकारी  माळी यांनी सूर्यवंशी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. 

संगीता सूर्यवंशी म्हणाल्या,  विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामाची संधी मिळाली. तानाजी सूर्यवंशी यांचा राजकीय वारसा सांभाळत विकास कामाची जाणीव ठेवून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com