तासगाव -  विसापूर रोडवर सांगली जिल्हा बँकेचे 25 लाख लुटले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

सांगली -  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची 25 लाखाची रोकड  चार अनोळखी व्यक्तींनी लुटली. तासगाव - विसापूर रोडवर आज  दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. 

सांगली -  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची 25 लाखाची रोकड  चार अनोळखी व्यक्तींनी लुटली. तासगाव - विसापूर रोडवर आज  दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी दुचाकीवरून तासगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शाखेत पैसे देण्यासाठी जात होते. तासगाव शाखेतून या कर्मचाऱ्यांनी 25 लाखांची रोकड घेतली.  ही रोकड बॅगमध्ये घेऊन दोघेजण आपल्या दुचाकीवरून विसापुरकडे निघाले होते.

पाळतीवर असलेल्या चार चोरट्यांनी दोन दुचाकीवरून या कर्मचाऱ्यांचा पाठलाग केला. त्यांनी या कर्मचाऱ्यांना तासगाव - विसापूर रस्त्यावर कॅनॉलजवळ  अडवले. त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली. त्यांना मारहाण केली. त्यांच्या हातातील 25 लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. आणि अवघ्या काही मिनिटात चोरटे ढवळीच्या दिशेने पसार झाले.

या घटनेची वाऱ्यासारखी बातमी तालुक्यात पसरली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तासगावात दाखल झाली आहे. या घटनेनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. तपासासाठी विविध भागात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Bank 25 lakh rs robbed on Tasgaon - Visapur road