हळदीची आवक जादा, दरही तेजीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिलपासून हळद दरातील तेजीमुळे आवकही वाढली आहे. राजापुरी हळदीची आवक 1 एप्रिल ते 11 एप्रिल या 11 दिवसांत 1.20 लाख क्विंटल झाली. किमान दर 6 हजार ते कमाल दर 12 हजार 800 रुपयांच्या दरम्यान मिळाला आहे. सरासरी दर 9500 रुपयांच्या दरम्यान आहे. प्रत्येक वर्षीच एप्रिल महिन्यात हळदीची मोठी आवक होते. चार वर्षांपूर्वी हळदीची आवक जादा झाल्यामुळे दरात घसरण झाली होती. 

सांगलीची हळद बाजारपेठ राज्यात प्रसिद्ध आहे. सांगली बाजार समितीकडे आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून हळदीची आवक होते. सांगली बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्‍वास असल्यामुळे दिवसेंदिवस व्यवहार वाढतच आहेत. दोन वर्षांपूर्वी सांगली बाजार समितीतील गैरसोयी आणि राज्यातील करामुळे कर्नाटकात बाजारपेठ हलविण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र तसे काही झाले नाही. बाजार समितीत सन 2015-16 या आर्थिक वर्षात राजापुरी हळदीची आवक 7.70 लाख क्विंटल झाली होती. सन 2016-17 वर्षात 6.97 लाख क्विंटल आवक झाली. आवक कमी झाली तरीही दर मात्र काहीचा चढाच मिळाला होता. 

सन 2016-17 मधील महिनानिहाय आवक (क्विंटल) व सरासरी दर (रुपयात) असा- एप्रिल 2016- 155866 (12050), मे- 95973 ( 11000), जून- 29505 (7200), जुलै- 6724 (8700), ऑगस्ट- 9013 (7930), सप्टेंबर- 5903 (8 हजार), आक्‍टोबर- 3899 (8662), नोव्हेंबर- 2632 (7800), डिसेंबर -643 (7363), जानेवारी 2017- 5835 (9125), फेब्रुवारी- 65487 ( 9650) व मार्च 316374 (9675). 

""हळदीची आवक आणि दरही सध्या चांगला मिळतो आहे. हळद पिकांसह अन्य सर्वच प्रकारच्या शेतीमालाला चांगला दर मिळण्यासाठी बाजार समितीचे संचालक मंडळांचा प्रयत्न आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आणखी एखादे संकुल लवकरच बांधण्याचा संकल्प आहे.'' 

प्रशांत शेजाळ, सभापती, सांगली बाजार समिती. 

Web Title: Sangli Bazar samiti