सांगली : येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना दिलेली सहा महिन्यांची मुदतवाढ 26 फेब्रुवारीला संपणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिल्यामुळे फेब्रुवारीअखेरीस बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल.

बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 26 ऑगष्ट 2020 रोजी संपली आहे. कोरोना प्रार्दुभावामुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. संचालकांनी न्यायालयात धाव घेऊन मुदतवाढीची मागणी केली होती. मुदतवाढीबाबत सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तत्पूर्वी सभापती दिनकर पाटील आणि संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली. 26 फेब्रुवारीपर्यंत ही मुदत आहे. त्यामुळे फेब्रुवारीनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल.
दरम्यान यंदाही बाजार समितीची निवडणूक शेतकऱ्यांच्या मतावर न होता, स्थानिक स्वराज्य संस्था, विकास सोसायटी, व्यापारी आणि हमाल, तोलाईदार गटातून होणार आहे. याबाबतचा महाविकास आघाडी सरकारने निवडणूक सुधारणा अध्यादेश काढला आहे. खरेदी विक्री व प्रक्रिया गटातून एक संचालक निवडून दिला जात होता. मात्र नव्या निवडणूक सुधारणामध्ये प्रक्रिया गटातील संचालकांना वगळण्यात आला आहे. नव्याने काढण्यात आलेल्या निवडणूक सुधारणाबाबत पणन संचालकांनी 8 जानेवारीपर्यंत हरकती मागविल्या होत्या. बहुतांशी बाजार समित्यांनी बाजार समितीची निवडणूक शेतकऱ्यांच्या मतावर न होता, स्थानिक स्वराज्य संस्था, विकास सोसायटी, व्यापारी आणि हमाल, तोलाईदार गटातून निवडणुकीची मागणी केली आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार