सांगलीत केलं प्रतिमा दहन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

सांगली : छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत व राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राम मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. दोघांच्या प्रतिमा दहन करण्यात आले. 

सांगलीत आज शिवप्रतिष्ठानच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी बारा वाजता राम मंदिर चौकात भाजपा आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. 

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारून त्याचे दहन केले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली. 

यावेळी भाजपाचे दीपक माने, विशाल मोरे, केदार खाडिलकर, पृथ्वीराज पाटील, अमित भोसले, धनेश कातगडे, राहुल माने, राजू जाधव, विश्वजीत पाटील, चेतन माडगुळकर, प्रथमेश वैद्य, प्रवीण कुलकर्णी, अजित ढोले, शांतीनाथ कर्वे, रमेश शिंदे, स्वप्नील माने, हेमंत कुलकर्णी, अनिकेत बेळगावे, आबासाहेब जाधव, राजू मद्रासी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli bjp protest