पाण्यात बसून नागरिकांचे सांगली महापालिकेविरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सांगलीत ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापूर वेळी शामराव नगर आणि परिसरातील विठ्ठल नगर, कालिका नगर, रुक्मिणी नगर अशा उपनगरांमध्ये पुराचे पाणी आले होते. त्यानंतर गेले दोन महिने सातत्याने जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या मोकळ्या भूखंडामध्ये पाणी साचून राहिले आहे.

सांगली - येथील शामराव नगरमध्ये नागरिकांनी गेले अनेक दिवस मोकळ्या भूखंडातील पाणी निचरा न केल्यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात आज जल आंदोलन केले. मोकळ्या भूखंडात साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Video : कोल्हापुरातील खड्ड्यांवर शाहिरी फटका 

या उपनरांमध्ये पसरली आहे दुर्गंधी

सांगलीत ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापूर वेळी शामराव नगर आणि परिसरातील विठ्ठल नगर, कालिका नगर, रुक्मिणी नगर अशा उपनगरांमध्ये पुराचे पाणी आले होते. त्यानंतर गेले दोन महिने सातत्याने जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या मोकळ्या भूखंडामध्ये पाणी साचून राहिले आहे. त्याचबरोबर येथील अनेक मोकळ्या भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणात झुडपेही वाढले आहेत. त्यामुळे तेथे साचलेल्या पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. डासांची उत्पत्ती वाढून मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी या परिसरात साथीचे आजार बळावले आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.

Video : खड्ड्यांवर कोल्हापूरकरांचे रॅप साँग 

प्रशासनास तक्रार देऊनही दुर्लक्ष

या परिसरात साचलेले पाणी काढावे यासाठी नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या उपनगरांमध्ये पाणी निचऱ्यासाठी ड्रेनेज तसेच गटारीचीही सुविधा नाही. त्यामुळे साचलेले पाणी बरेच दिवस तसेच राहते. त्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

अबब ! झाडांवर मारलेले खिळे निघाले सात किलोचे 

आंदोलनामध्ये पुरषांबरोबर महिलांचाही सहभाग

पाणी काढण्याच्या मागणीकडे महापालिका प्रशासनाने इशारा देऊनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी या परिसरातील नागरिकांनी थेट मोकळ्या भूखंडामध्ये साचलेल्या पाण्यात बसून जलआंदोलन केले. शिवाय महापालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे आंदोलन या भागातील सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी तसेच अमर पडळकर यांचे नेतृत्वाखाली झाले. यामध्ये पुरुष आणि महिलांनी सहभाग घेतला.

धक्कादायक ! मिरज सिव्हीलमधील तीन रूग्णांना फेकले रस्त्यावर 

अबब ! बेळगावात मटणाचा दर 600 रूपये किलो 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Citizen Agitation Against Corporation