जिल्हाधिकारी कार्यालय २२ कोटींचे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

सांगली - सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे साकारलेल्या भव्य जिल्हाधिकारी कार्यालयावर तब्बल २१ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गेली दोन वर्षे या इमारतीचे काम सुरू होते. तीन मजली या इमारतीचा उद्‌घाटन सोहळा उद्या (ता. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सांगलीच्या वैभवात भर टाकणारी ही वास्तू आहे.

सांगली - सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे साकारलेल्या भव्य जिल्हाधिकारी कार्यालयावर तब्बल २१ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गेली दोन वर्षे या इमारतीचे काम सुरू होते. तीन मजली या इमारतीचा उद्‌घाटन सोहळा उद्या (ता. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सांगलीच्या वैभवात भर टाकणारी ही वास्तू आहे.

मुख्य इमारत, पाणी पुरवठा, जल निस्सारण, रस्ते,  गटारी, सुरक्षा भिंत, फर्निचर आणि वीज जोडणी या सर्वांचा एकत्रित खर्च २१ कोटी ९० लाख रुपयांचा आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी प्रस्तावित खर्चामध्ये कोणतीही वाढ करावी लागली नाही. अद्याप या इमारतीभोवती बगीचा करण्याचे काम बाकी असून वन विभागाच्या मदतीने पावसाळ्यात ते सुरू केले जाणार आहे. 

रंगकाम नाही
या इमारतीकडे पाहताच त्याची भव्यता लक्षात येते; मात्र उद्‌घाटन सोहळा तोंडावर आला तरी रंगकाम का केले नाही, असा सामान्य प्रश्‍न पडतो. वास्तविक, या इमारतीला बाहेरून रंग देण्याची आवश्‍यकताच नाही. बाहेरील बाजूने त्याला ॲग्रिगेट प्लास्टर वापरण्यात आले आहे. हे एक प्रकारचा रंगच आहे.

* पहिला मजल्यावर चारचाकी
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष आहे. तिथेपर्यंत जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी  आकर्षक रस्ता बनवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहने थेट दुसऱ्या मजल्याच्या दारात जाऊ शकणार आहेत.

* पुण्याच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञ विभागाने सुचवला आराखडा.
* सार्वजनिक बांधकामच्या सांगली उपविभागाची देखरेख.
* मोहिते अँड सन्स फर्मचे अमर मोहिते यांनी केले बांधकाम.

अशी आहे रचना
 तळमजला ः स्टोअर रूम, रेकॉर्ड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल, आवक-जावक विभाग, कॅन्टिन.
 पहिला मजला ः जिल्हाधिकारी कक्ष, बैठक कक्ष, स्वीय सहायक कक्ष, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विश्रांती कक्ष, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी कक्ष,  करमणूक विभाग, रोहयो विभाग आणि नियोजन विभाग.
 दुसरा मजला ः अपर जिल्हाधिकारी कक्ष, त्यांचे कोर्ट रूम, जिल्हा नियोजन बैठक हॉल, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कक्ष. 
 पार्किंग ः तळमजल्यावर कर्मचारी, अधिकारी. 

Web Title: sangli collector office