सांगली पालिकेत स्वीकृत सदस्यांच्या निवडी जाहीर

सांगली पालिकेत स्वीकृत सदस्यांच्या निवडी जाहीर

सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने माजी उपमहापौर शेखर इनामदार यांची निवड केली. पण उर्वरित दोन जागांवर निवडणुकीत पराभूत झालेले विवेक कांबळे आणि रणजित पाटील सावर्डेकर यांना संधी दिली.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर आज पहिली महासभा झाली. यात पाच स्वीकृत सदस्यांबरोबरच स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. भाजपचे गटनेते युवराज बावडेकर,राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान आणि काॅंग्रेसकडून विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी स्वीकृत सदस्यांची नावे महापौर संगीता खोत यांच्याकडे सुपुर्द केली.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापालिकेची जबाबदारी शेखर इनामदार यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केले होते. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदी इनामदार यांचे नाव निश्चित होते, उर्वरीत दोन नावांसाठी अनेकजण इच्छूक असताना भाजपने निवडणुकीत पराभूत झालेले माजी महापौर विवेक कांबळे आणि रणजित पाटील सावर्डेकर यांना संधी दिली.

काॅंग्रेसकडून पक्षाचे प्रवक्ते करीम मेस्री यांची स्वीकृृत सदस्यपदी निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून आयुब बारगीर यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. महापौर संगिता खोत यांनी महासभेत ही नावे जाहीर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com