सांगली महापालिका सभेत अमृत योजनेवरुन गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सांगली - मिरजेतील अमृत योजनेच्या ठेकेदारास वाढीव दराने बिले न देण्याबाबत महासभेत निर्णय झाला असताना ती दिल्याबद्दल आज महासभेत गोंधळ झाला.

सांगली - मिरजेतील अमृत योजनेच्या ठेकेदारास वाढीव दराने बिले न देण्याबाबत महासभेत निर्णय झाला असताना ती दिल्याबद्दल आज महासभेत गोंधळ झाला.

अमृत योजनेच्या ठेकेदारास नियमानुसार महापालिकेने झालेल्या कामाचे 25 टक्के बिल देण्याचे आहे. तर उरलेले बिल केंद्र आणि राज्य शासनाने देण्याचे आहे. पण महापालिकेने 11 कोटी रुपये जादा बिल दिले आहे. हा व्यवहार काँग्रेस सदस्यांनी आज उघड करून चौकीदार चोर है असा आरोप प्रशासनावर केला. मात्र या शब्दावरुन भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालत शब्द मागे घेण्याची मागणी केली. त्याशिवाय सभागृह चालू न देण्याचा इशारा दिला. यावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.

महापौरांनी या गोंधळातच शब्द मागे घ्या नाहीतर निलंबित करण्याचा इशारा देत सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली. दरम्यान अधिकारी चोर शब्दाचा धिक्कार करून सभागृहाबाहेर पडले 

Web Title: Sangli corporation meeting report