esakal | सांगली महापालिकेचे दिवसात ५० हजार लसीकरणाचे उद्दीष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

सांगली महापालिकेचे दिवसात ५० हजार लसीकरणाचे उद्दीष्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रात उद्या बुधवारी होणाऱ्या महालसीकरण अभियानामध्ये पन्नास हजार जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लसीकरण सत्राचे प्रत्येक प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी कोविड लसीकरण बूथवर सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, महापालिका क्षेत्रात 194 लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास आणखी वाढविण्यात येतील. महापालिका क्षेत्रात भाजीपाला विक्री करणारे, फेरीवाले, बांधकाम कामगार यांच्या लसीकरणाचीही सोय करण्यात आली आहे. या दिवशी एकही डोस न घेतलेल्या तसेच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी कोविड लस देण्यासाठी नियोजन केले आहे.

हेही वाचा: दलपतचं पुन्हा ‘केम छो...’ भरकटलेला बेघर पोहचला गुजरातला

महानगरपालिका क्षेत्रात १९४ लसीकरण केंद्रांवर लसीकरणाठी आवश्यक असणारा सर्व स्टाफ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आशा वर्कर्स, एनएनएम, जीएनएम, नर्सेस, वैद्यकिय अधिकारी, लसटोचक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीकरण व्हावे यासाठी हे महालसीकरण अभियान आयोजित केले आहे. लसीकरणाच्या ठिकाणी दिव्यांग, वयोवृध्दांना लस मिळावी यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. लसीकरण सुलभ पध्दतीने व्हावे यासाठी लसीकरण सेंटर्सवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एका दिवसात पन्नास हजार नागरिकांना लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवले असल्याने ते पूर्ण करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, क्रिडाई, विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था यांच्याबरोबर बैठक घेवून योग्य ते नियोजन केले आहे.

हेही वाचा: हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस गती

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या वतीने १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय संस्था यांच्यामार्फत पहिला डोस झालेले २,३९,६५६ इतके लाभार्थी व दुसरा डोस घेऊन पूर्ण लसीकरण झालेले १,०३,८८० इतके लाभार्थी आहेत. त्यानुसार पहिल्या डोसचे ५८ टक्के व दुसऱ्या डोसचे २५ टक्के इतके नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.महापालिकेने उद्या बुधवारी आयोजित केलेल्या महा लसीकरण अभियानात सर्व १८ वर्षांवरीलनागरिकांनी सहभागी व्हावे आणि कोविड लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

loading image
go to top