कर्जमाफी...शेतकरी, सोसायट्या संभ्रमात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

सांगली - विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गदारोळ सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही? याबाबत कोण ठाम काहीच सांगू शकत नाही. त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सेवा सोसायच्याच्या कर्जवसुलीवर झालेला दिसतो आहे. मार्चअखेर पीक कर्ज फेडण्याची लगबग सुरू असते. मात्र, सध्या कर्जमाफीच्या अशा पल्लवीत झाल्याने संभ्रम वाढला आहे. सोसायटीची कर्जफेड लांबणीवर टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 

सध्या शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा हातात पैसा नाही ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटनांच्या पातळीवरही शांतताच आहे. अशातच "कर्जमाफी होणार' ही पुंगी वाजू लागली आहे. विरोधी पक्षांचा आग्रह पाहता कर्जमाफी मिळेल अशी आशा निर्माण झाल्याने दोन आठवड्यांपूर्वी सोसायटीत कर्जफेडीसाठी होणार गर्दी पूर्णपणे रोडावली आहे. शेतकऱ्यांचा नजरा शासनाच्या घोषणेकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी पीक कर्ज फेडण्यापेक्षा आणखी थोडे दिवस वाट पाहून ही मानसिकता तयार झाल्याचे दिसते आहे. एक लाखाहून अधिक शेतकरी जिल्ह्यातील गावनिहाय सोसायट्यांमार्फत पीक कर्ज उचलतात. खरीप पिक कर्ज फेडण्याची मुदत 31 मार्च असते. सर्वसाधारणपणे शेतकरी कर्ज फेडून नवीन प्रकरणे करीत असतात. त्यामुळे मार्चअखेरीस कर्ज फेडण्यास सोसायट्यांच्या दारात लगबग असते. कर्जमाफी मिळाली तर इमानेइतबारे कर्जफेड करणाऱ्याला लाभ काय? हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहणार आहे. त्यामुळे तूर्त तरी पीक कर्ज न भरण्यालाच शेतकऱ्यांची पसंती दिसते आहे. 

खरीप कर्जधारकांची अवस्था केविलवाणी 
खरीप पीक कर्ज हे 31 मार्चपूर्वी भरायचे असते. ते जर वेळेत भरले नाही तर 4 टक्के लाभाचा शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. उसासारख्या नगदी पिकाचे कर्ज फेडण्यासाठी 31 जूनपर्यंतची मुदत असल्याने याबाबत अद्याप शेतकरी वाट पाहू शकतो. खरी गोची होणार आहे ती खरीप पीक कर्ज उचललेल्या शेतकऱ्यांची त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. 

"नोटबंदी'तील व्याजमाफी 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या काळात 61 दिवसांसाठी चार टक्के व्याजमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील एक लाख 14 हजार 706 शेतकऱ्यांना 4 कोटी 33 लाख 6 हजार 672 रूपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ती रक्कम 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

Web Title: sangli district bank