जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष बदलणार? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

सांगली - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील व उपाध्यक्ष संग्रामसिह देशमुख यांना बदलण्यासाठीच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या कारकिर्दीस 20 मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, हे एक निमित्त आहे. तर वसंतदादा कारखाना निविदेवरून अध्यक्षांबद्दल राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी आहे. तर देशमुख झेडपीचे अध्यक्ष झाल्याने त्यांना आता बॅंकेच्या उपाध्यक्षपदाबाबत स्वारस्य राहिलेले नाही. त्यांनी राजीनामाही दिला होता; मात्र तो स्वीकारलेला नाही, अशी चर्चा आहे. 

सांगली - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील व उपाध्यक्ष संग्रामसिह देशमुख यांना बदलण्यासाठीच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या कारकिर्दीस 20 मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, हे एक निमित्त आहे. तर वसंतदादा कारखाना निविदेवरून अध्यक्षांबद्दल राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी आहे. तर देशमुख झेडपीचे अध्यक्ष झाल्याने त्यांना आता बॅंकेच्या उपाध्यक्षपदाबाबत स्वारस्य राहिलेले नाही. त्यांनी राजीनामाही दिला होता; मात्र तो स्वीकारलेला नाही, अशी चर्चा आहे. 

जिल्हा बॅंकेतील सत्ताधारी गटात गेल्या दोन महिन्यांपासून अध्यक्ष श्री. पाटील यांना पदापासून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. वसंतदादा कारखान्यांच्या निविदा प्रकरणी विश्‍वासात न घेतल्याचे कारण देऊन असंतुष्ट संचालकांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या प्रकरणी स्वतः आमदार पाटील बॅंकेचे अध्यक्ष श्री. पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. इस्लामपूर येथूनच अध्यक्षांच्या बदलीसाठीच्या सूत्रे हालवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत 460 अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. भरतीच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांश संचालकांनी सुपाऱ्या घेतल्या आहेत. वसंतदादा कारखाना निविदेचे निमित्त साधून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष श्री. पाटील व उपाध्यक्ष श्री. देशमुख या दोघांनाही बदलण्याच्या हालचाली आहेत. त्याचे कारण असे आहे की, या दोघांनीही भरती प्रक्रिया सातत्याने गुणवत्तापूर्ण होईल, असे जाहीर केले. याचीही काही संचालकांना भीती वाटते आहे. गेल्या आठवड्यातच जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी आता या पदावर एक दिवसही काम करण्यात रस नसल्याची खंत व्यक्त केले होती. याचाच अर्थ त्यांनाही सध्या बदललेल्या परिस्थितीचा अंदाज आला आहे. 

उपाध्यक्षांनी राजीनामा दिला होता पण? 

बॅंकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची झेडपीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर श्री. देशमुख यांनी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याकडे दिला होता. त्यावेळी झेडपी अध्यक्ष आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दोन्ही पदांबाबत श्री. देशमुख संभ्रमात होते. एक पद स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि दुसरे पद सहकारातील असल्यांमुळे अडचण नसल्याचे स्पष्ट झाले. बॅंक अध्यक्ष श्री. पाटील यांनी उपाध्यक्ष श्री. देशमुख यांचा राजीनामा परत केल्याची चर्चा आहे. अध्यक्ष बदलांच्या निमित्ताने पुन्हा उपाध्यक्ष श्री. देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सत्ताधारी राष्ट्रवादीवर ताक फुंकून प्यायची वेळ... 

जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी सत्तेत आहे. मात्र अध्यक्ष-उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्यास पुन्हा पदाधिकारी निवडताना राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागेल. जिल्हा बॅंकेच्या नुकसानीबद्दल 7 संचालकांकडे अध्यक्षपद देताना अडचणी येतील. यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेले संचालकही शर्यतीत असतील. मात्र ऐनवेळी सात संचालकांवर सत्ताधारी भाजपने कारवाईची भीती दाखवली आणि सत्ताबदल करायचा प्रयत्न केला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीला दूध नव्हे ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. 

Web Title: Sangli - District Central Co-operative Bank