सांगली जिल्हा नियोजन समितीची 442 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

Sangli District Planning Committee approves draft plan of Rs 442 crore
Sangli District Planning Committee approves draft plan of Rs 442 crore

सांगली ः जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 च्या 442 कोटी 88 लाखांच्या प्रारूप आराखड्यास पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिरिक्त मागणी 127 कोटी 26 लाखांची आहे. बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2020-21 च्या 37 कोटी 8 लाख रुपयांच्या पुनर्विनियोजन प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. 

समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, झेडपी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सर्वश्री मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, अरुण लाड, सुरेश खाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, झेडपी सीईओ जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते. 

सन 2020-21 मध्ये वार्षिक योजनेंतर्गत 18 जानेवारी अखेर खर्चाचा आढावा घेतला. सर्वसाधारण योजनेंतर्गत 285 कोटी मंजूर पैकी 34.37 कोटी खर्च झाला. विशेष घटक अंतर्गत 83.81 कोटी मंजूर मधील 36.70 कोटी खर्च झाले. आदिवासी कार्यक्रमांतर्गत 98 लाख मंजूर आहेत. एकूण 369.79 कोटी मंजूर पैकी 71.07 कोटी खर्च झाला आहे. केवळ 19.22 टक्के खर्च आहे. उर्वरित निधी अखर्चिंत राहणार नाही याची दक्षताचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले. 
राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी, पीक विमा ऐच्छिक करण्यात आला असून केंद्र सरकारने यामधील हिस्सा कमी केला आहे, त्यामुळे राज्य शासनावर त्याचा बोजा वाढणार आहे. याबाबत राज्यस्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. जतमध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांशी चर्चा सुरू असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

घराची पडझड...चार दिवसात निधी... 
महापुरात नुकसान झालेल्यांचे पंचनामे झाले मात्र त्यांना आर्थिक मदत वेळेत मिळली नाही, ही बाबत शरद लाड यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यावर सीईओ डुडी यांनी चार दिवसात लाभार्थीच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असे सांगितले. सुरेद्र वाळवेकर यांनी पात्र लाभार्थींना लाभाची मागणी केली. 

महामार्ग रस्त्यांची गुणवत्ता तपासा... 
जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची गुणवत्ता तपासा, अशी मागणी आमदार अरुण लाड यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी केली. याबाबत सर्वच सदस्यांनी रस्त्यांची गुणवत्ता काही भागात राखली जात नसल्यांच्या तक्रारी केल्या आहेत. 

बैठकीत महत्त्वाचे 

  • जत येथे मका खरेदी केंद्र होणार. 
  • गावठाण, वाडीसाठीचे प्रस्तावावर निर्णय घेणार. 
  • मोबाईलवर रेकॉर्डिंग करताना झेडपी सदस्याच्या पतीवर राज्यमंत्री कदम भडकले. 
  • जिल्ह्यात 1013 शेतकऱ्यांना दोन दिवसांत कृषीसाठी वीजपुरवठा. 

संपादन : युवराज यादव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com