सांगली जिल्हा शौचालय उभारणीत विभागात दुसऱ्या स्थानावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सांगली - जिल्हा शौचालय उभारणीत पुणे विभागात दुसऱ्या स्थानावर आहे. पहिला क्रमांकावर पुणे तर तिसऱ्या स्थानावर सातारा जिल्हा आहे. सांगली जिल्ह्यातील 93 टक्के कुटुंबांकडे शौचालये आहेत. उर्वरित सर्व कुटुंबांकडे मार्चअखेर शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. 

प्रत्येक घरी शौचालयांसाठी मोहीम सुरू आहे. जिल्ह्यात 3 लाख 60 हजार 653 कुटुंबे आहेत. त्यातील 3 लाख 35 हजार 659 कुटुंबांकडे (93 टक्के) शौचालये आहेत. 1 लाख 23 हजार 26 कुटुंबांकडे ती नव्हती. त्यातील 71 हजार 52 शौचालय उभारणीचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत 50 हजार 33 शौचालये उभारली. डिसेंबर अखेरपर्यंत 24 हजार 421 शौचालये उभारली जाणार आहेत. मार्चअखेर घरटी शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील 699 ग्रामपंचायतींपैकी 627 गावे हागणदारीमुक्त झालीत. 72 गावे बाकी आहेत. मिरज तालुक्‍यातील 6 आणि जत तालुक्‍यातील 66 गावांचा समावेश आहे. राज्य शासनाने हागणदारीमुक्तीची घोषणा करताना 90 टक्के कुटुंबांकडे शौचालय असावे, अशी अट आहे. 

शौचालय नसलेली कुटुंबे... 

वाळवा- 1119, तासगाव-1196, आटपाडी- 773, शिराळा- 1534, कवठेमहांकाळ- 1196, 
मिरज-3963, जत- 10549.

Web Title: Sangli district toilet