उत्पादन शुल्कला जाग येते तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

सांगली - महापालिका निवडणुकीत पैसा आणि दारूचाही महापूर येणार अशी अटकळ सामान्यांना आहे. मात्र दोन-तीन दिवसांत राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईने त्यावर शिक्कामोर्तब केल्यास आश्‍चर्य वाटू नये. उत्पादन शुल्क विभाग जागा आहे का? अशी विचारणा होण्यापूर्वीच त्यांना जाग आली... आणि त्यांनी कारवाई सुरू केली हे बरे झाले.

मिरजेत कळंबीच्या हद्दीत कंटेनरमधून बेकायदापणे आणलेल्या देशी दारूच्या ९० मिलीच्या एक लाख बाटल्या जप्त केल्या. नऊ लाख ११ हजार २५० रुपयांचा कर चुकवून आणलेली ही दारू तब्बल २६ लाख रुपये किमतीची आहे. विशेष म्हणजे कारवाई स्थानिक पथकाऐवजी मुंबई पथकाने केली. मग स्थानिक विभागाला माहिती मिळाली नाही का? यापूर्वीही विभागीय उपायुक्तांनीच अनेक कारवाया केल्या. त्यामुळे स्थानिक अधिकारी, त्यांची पथके यांची यंत्रणा कमी पडते असेच दिसून येते.

महापालिका निवडणुकीनिमित्त उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. अवैध मद्यविक्री वाढणार हे उघड आहे. विशेष करून या काळात बनावट दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका क्षेत्रात तीन भरारी व दक्षता पथके तैनात केलीत. या पथकांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत  अवैध मद्यविक्रीचे २२ गुन्हे नोंदवलेत. सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल व दोन वाहने जप्त करण्यात आली. बेकायदा मद्य विक्री  रोखण्यासाठी दारू दुकाने, हॉटेल, ढाबे यांची अचानक तपासणी करण्यात येते. निवडणूक काळात राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने २४ तास संपर्क कक्ष सुरू करण्यात आला. पण, केवळ निवडणूक काळातच ही दक्षता कशासाठी? इतरवेळीही बनावट दारू येतेच, मात्र त्यावेळी दुर्लक्ष केले जाते की त्याची माहिती मिळत नाही? निवडणूक काळात उत्पादन शुल्कला जाग आल्याने दुकानदारांत खळबळ उडाली आहे.

Web Title: sangli Excise duty department