सांगली : तीस शेतकरी कंपन्यांना २३० कोटींचे प्रकल्प मंजूर

राज्यात ‘ॲग्री बिझनेस’अंतर्गत ७२ कोटींचे प्रस्तावित अनुदान
agri
agrisakal

सांगली : राज्यातील फलोत्पादनामध्ये मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी जागतिक बॅंकेतर्फे महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या २३० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे, तर ७२ कोटींचे अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे.या प्रकल्पासाठी पात्र ठरलेल्या संस्थांमध्ये सांगली जिल्ह्यातील एकमेव संस्थेचा समावेश आहे.

राज्यातील जिल्हानिहाय पात्र संस्थांमध्ये नाशिक- ४, नगर -३, सोलापूर -३, अमरावती -२, औरंगाबाद २, कोल्हापूर २, नांदेड २, सातारा २, पुणे १, सांगली १, बीड १, बुलडाणा १, उस्मानाबाद १ हिंगोली १, नंदूरबार १ यांचा समावेश आहे.

प्रकल्प संचालक दीपक शिंदे यांनी याबाबत नुकतीच ही माहिती प्रसिध्द केली आहे. राज्यातील शेती उत्पादनांचे काढणीपश्‍चात नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी विकसित केली जात आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासूनच्या पहिल्या टप्प्यांत राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून १६९ प्रस्ताव सादर झाले होते.

यामध्ये १२४ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ४५ मूल्यसाखळी गुंतवणूकदारांचा समावेश होता. या प्रस्तावांची छाननी करून पात्र ३० संस्थांची निवड करण्यात आली आहे. या संस्थांच्या २३० कोटींचे प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. यामधील ७२ कोटींच्या अनुदानास या संस्था पात्र झाल्या आहेत.

प्रकल्पात ११ पिकांचा समावेश

तंत्रज्ञानाअभावी शेतीमालाचे काढणीपश्‍चात मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी पॅकहाऊस, प्रतवारी केंद्र, शीतगृह, रायपनिंग चेंबर, रेफर व्हॅन, फळे, भाजीपाला निर्जलीकरण तंत्रज्ञान, निर्यात सुविधा आदी. या पिकांच्या मूल्यवर्धनासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पात डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, भेंडी, मिरची (लाल आणि हिरवी) व फुले या ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com