Sangli farming different experiment Sixteen gunthas60 days income | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

सांगली : सोळा गुंठे, ६० दिवस उत्पन्न दीड लाखांचे

दिघंची : पारंपरिक पिकांना बगल देत वेगळा प्रयोग म्हणून येथील साळसिंग मळा येथे वैभव माईनकर यांनी फ्लॉवर लागवड करून १६ गुंठे क्षेत्रात साठ दिवसांत दीड लाखांचे उत्पन्न घेतले. या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून लवकरच क्षेत्र वाढवून उत्पादित होणारा फ्लॉवर, तरकारीद्वारे बाहेरच्या बाजारात पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘विकेल ते पिकेल’ या तत्त्वानुसार आता पारंपरिक पिकांना फाटा देत युवा शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे अभिनव प्रयोग करू लागले आहेत. ज्वारी, बाजरी, गहू, मटकीसह या पिकांना योग्य भाव व उत्पादित खर्च निघत नसल्याने या भागातील शेतकरी कमी कालावधीत भरपूर शेती उत्पादन व नगदी पैसे मिळवून देणाऱ्या पिकांकडे वळू लागले आहेत.

दिघंचीपासूनच जवळ असलेल्या साळसिंग येथे शेतीसाठी पाण्याचे अत्यल्प प्रमाण आहे. ऊस, डाळिंब, द्राक्षासारखी पिके घेता येत नाही. ही पिकेही सध्या हुकमी राहिली नाहीत. रोगांचा प्रादुर्भाव व उत्पादनखर्च वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब व द्राक्षबागा काढून टाकल्या आहेत. सध्या परिसरात उसाचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र उसापेक्षा तो साखर कारखान्याला पाठविण्याचे आव्हान नव्हे, संकट शेतकऱ्यांपुढे आहे. ऊस पाठविण्यासाठी साखर कारखान्यांकडे हेलपाटे मारणे, ऊसतोडणी करणारी यंत्रणा आल्यावर त्यांची एकरी दहापासून १५ हजार रुपयांची व्यवस्था करणे, यामुळेही शेतकरी साखर कारखान्यावर नाराज आहेत.

त्यावर उपाय म्हणून माईनकर यांनी १६ गुंठे क्षेत्रात ड्रीपपासून औषध फवारणी व अन्य असा ३० हजारांचा खर्च आला. सध्या बिगर पाल्याच्या फ्लॉवर किलोस रुपये ४० व पाल्यासह २५ रुपये असा दर मिळत आहे. माईनकर यांनी ७ हजार ५०० रोपांची लागण केली. सध्या कोकणात फ्लॉवरला मागणी चांगली आहे. उत्पादित माल तातडीने विक्री होतो. टॉनिक म्हणून फ्लॉवरला फवारणी करावी लागते. योग्य नियोजन केल्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले.

मी (सचिन) व भाऊ वैभव दोघेही शेती करतो. लवकरच एक जण शेती व एक उत्पादित मालाचे तरकारी मार्केटिंग करणार असून त्यामुळे शेतीमालाला चांगला दर मिळेल. सध्या कऱ्हाड मार्केटला येथे आम्ही शेतमाल पाठवतो.

-सचिन माईनकर, शेतकरी.

Web Title: Sangli Farming Different Experiment Sixteen Gunthas60 Days Income

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top