#SangliFloods ब्रह्मनाळला आणखी दोन मृतदेह सापडले; चारजण बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पलूस - ब्रह्मनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आणखी दोघांचे मृतदेह आज हाती लागले. यामुळे मृतांचा आकडा आता अकरा झाला आहे. अद्याप चारजण बेपत्ता आहेत.

पलूस - ब्रह्मनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आणखी दोघांचे मृतदेह आज हाती लागले. यामुळे मृतांचा आकडा आता अकरा झाला आहे. अद्याप चारजण बेपत्ता आहेत.

ब्रह्मनाळ येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता महापुरातून बाहेर पडून खटाव येथे सुरक्षित ठिकाणी जात असताना बोट उलटली होती. यामध्ये 30 ग्रामस्थ होते. यापैकी पंधरा जणांना वाचवण्यात यश आले, मात्र नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात एक लहान मुलासह सात महिलांचा समावेश होता. सहाजण बेपत्ता होते. पैकी दोघांचा मृतदेह आज सकाळी हाती लागला. अद्याप चारजण बेपत्ता आहेत.

या घटनेने ब्रम्हनाळ आणि पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कृष्णा नदीच्या पुराने चहूबाजूंनी वेढलेल्या या भागात अश्रुंचाही बांध फुटला आहे. नातेवाईकांचा हंबरडा मनाला वेदना देणारा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood Bramhnal incidence two bodies found; four still missing