#SangliFloods कणेगाव बुडालं १०० टक्के ! पण.... (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

वारणा नदीला आलेल्या पुरात अख्खं गाव बुडालं. पण पुराच्या नेहमीच्या अनुभवामुळे गावातील युवकांनी पुढाकार घेत योग्य नियोजन केले. यामुळे या गावात एकही जीवितहाणी झाली नाही. शासनाच्या आदेशाची वाट पाहात ते बसले नाहीत. सहा तारखेला गावात पुर येणार अशी चाहुल लागताच अख्खं त्यांनी गाव सुरक्षितस्थळी हलवलं. यामुळे माणुसच काय पण एखादे मांजरही या पुरात मृत झाले नाही. त्या गावाचे नाव आहे कणेगाव ( ता. वाळवा. जि. सांगली).

कणेगाव - वारणा नदीला आलेल्या पुरात अख्खं गाव बुडालं. पण पुराच्या नेहमीच्या अनुभवामुळे गावातील युवकांनी पुढाकार घेत योग्य नियोजन केले. यामुळे या गावात एकही जीवितहाणी झाली नाही. शासनाच्या आदेशाची वाट पाहात ते बसले नाहीत. सहा तारखेला गावात पुर येणार अशी चाहुल लागताच अख्खं त्यांनी गाव सुरक्षितस्थळी हलवलं. यामुळे माणुसच काय पण एखादे मांजरही या पुरात मृत झाले नाही. त्या गावाचे नाव आहे कणेगाव ( ता. वाळवा. जि. सांगली). त्यांचा हा आदर्श निश्चितच घेण्यासारखा आहे.  पण त्यांच्याही व्यथा आहे. या पुराच्या फटक्याला ते शासनाला जबाबदार धरतात. नेहमीच पुर येतो. पण शासनाने गावातील 450 कुटुंबापैकी केवळ 100 कुटुंबाचेच पुर्नवसन केले. शासनाच्या या अशा कारभाराचा फटका मात्र या गावाला सोसावा लागला आहे. 

या महापुरात गावांमध्ये केवळ दोन व्यक्ती थांबून होत्या. त्यातील एक म्हणजे संजय पाटील. पाटील यांनी 1989, 2005 आणि आता 2019 चा महापूर हा गावात राहून पाहिला आहे. ते म्हणतात, शासनाचे या पुराने जर डोळे उघडले नाहीत तर पुर्नवसनासाठी आता आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Flood Kanegaon special Video story