#SangliFloods वाळवा तालुक्‍यात साडेसात हजार हेक्‍टरवर नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

इस्लामपूर -  महापूराच्या प्रलयामुळे वाळवा तालुक्‍यातील साडेसात हजार हेक्‍टर शेतजमीन आणि शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. पूरग्रस्त लोक शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

इस्लामपूर -  महापूराच्या प्रलयामुळे वाळवा तालुक्‍यातील साडेसात हजार हेक्‍टर शेतजमीन आणि शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. पूरग्रस्त लोक शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जीवनदायिनी कृष्णा व वारणा नद्यांनी रुद्ररूप धारण केल्याने वारणा गावातील १० तर कृष्णा काठावरील २७ आशा एकूण ३७  गावांचे होत्याचे नव्हते झाले आहे. पाणी पत्रात जाईल तसे झालेले नुकसान डोळ्यासमोर येऊ लागले आहे. उंच भागातील मोजकी घरे वगळता तालुक्‍यातील पूरग्रस्त गावातील बहुतांशी घरी पाण्याखाली गेल्याने तालुक्‍यात शेकडो घरांची पडझड झाली आहे. तालुक्‍यात एकूण १० हजार कुटुंबे पुरबधित आहेत. पाणी कमी होत तसे नागरिक आपल्या घरी परतत आहेत. मात्र ढासळलेले घरे पाहून लोक रडताना दिसत आहेत. 

महापुराने  तालुक्‍यातील वारणा व कृष्णा या नदीकाठच्या गावातील अनेक घरी कवेत घेतली. या घरात चार ते पाच दिवस पाणी साचून राहिल्याने व भिंती पूर्ण भिजल्याने मोठी घरे ढसाळली आहेत. त्यामुळे यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. बहुतेक लोक कष्टकरी आहेत. ढासळलेला घरामुळे लोकांची सर्वस्व महापुराने हिरवले आहे. 

दोन्ही काठावरील साडेसात हजार हेक्‍टर शेतजमीन पाण्याखाली गेली असल्याने ऊस, भुईमूग, सोयाबीन, हळद, कडधान्य, आदी पिके कुजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील वर्षाचे नियोजन कोलमडले आहे. खरीप पिकावर शेतकऱ्यांचे पुढील वर्षाचे नियोजन अवलंबून असते. परंतु महापुरात हे सर्व हिरावून गेल्याने या पिकांसाठी काढलेली कर्ज कशी फेडायची असा यश प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. पुरबधित शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

‘साडेसात हजार हेक्‍टरच्या आसपास शेतीचे नुकसान झाले आहे. पाणी कमी झाल्यानंतर आकडेवारी वाढण्याची 
शक्‍यता आहे.’
- भगवानराव माने,
तालुका कृषी अधिकारी, वाळवा

‘पूरग्रस्त भागात सर्वेक्षण करून शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू.’
- सचिन हुलवान, 
सभापती, वाळवा पंचायत समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Floods crop damage on 7.5 thousand hector in walva Taluka