#SangliFloods शिराळा तालुक्यात वारणेचा पुर लागला ओसरू

शिवाजीराव चौगुले
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

शिराळा -  तालुक्यात वारणेला आलेला पुर ओसरू लागला आहे. चांदोली ते देववाडीपर्यंतची पुराच्या पाण्याखाली गेलेली घरे आता मोकळी झाली आहेत. सध्या धरणातून ११ हजार विसर्ग सुरू आहे. २५.३८ टीएमसी.म्हणजे ९२.२१ टक्के पाणीसाठा आहे. 

शिराळा -  तालुक्यात वारणेला आलेला पुर ओसरू लागला आहे. चांदोली ते देववाडीपर्यंतची पुराच्या पाण्याखाली गेलेली घरे आता मोकळी झाली आहेत. सध्या धरणातून ११ हजार विसर्ग सुरू आहे. २५.३८ टीएमसी.म्हणजे ९२.२१ टक्के पाणीसाठा आहे. 

शिराळा पश्चिम भागात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तालुक्यातील २० गावातील ६०५ कुटुंबे व २७२६ जनावरे स्थलांतरित केली आहेत. या कुटुंबियांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ व गहू वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. 

तालुक्यात ३३३ अंशतः व पुर्णतः ९ अशा एकूण ३४२ घरांची पडझड झाली आहे. पुरग्रस्थ असणाऱ्या गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा धुवून घेण्यास शिक्षकांनी सुरवात केली आहे. पाण्यात बुडालेली घरे, गोठे व गावात धूर फवारणी करण्याचे काम सुरू आहे. वारणा काठी असणारी  अनेक जनावरांची शेड वाहून गेली आहेत. पूर ओसरू लागल्याने लोक आपले शेड पाहण्यासाठी वारणा काठी जाऊ लागले आहेत.

बिळाशी येथील अर्जुन पाटील, उत्तम कदम, विष्णू पाटील, उत्तम पाटील, शशिकांत पाटील, भगवान मांगरुळकर, मोहन पाटील, धनाजी पाटील, यशवंत साळुंखे, बाळू साळुंखे, दिलीप साळुंखे, जालिंदर साळुंखे, बाबुराव रोकडे, महादेव रोकडे, लक्ष्मण रोकडे, वसंत रोकडे, जालिंदर रोकडे, संजय रोकडे यांच्या जनावरांच्या शेडचे नुकसान झाले आहे. दुपारपासून बिळाशी - कोकरूड येथील पुलावरील पाणी कमी झाल्याने सायंकाळपासुन पुलाचे कठडे दिसू लागले होते.

७४ व्या वर्षी शेडसाठी वारणा काठी
पुराच्या पाण्यात बिळाशी येथील यशवंत रोकडे यांचे शेड बुडाले आहे. आज पाणी कमी होऊ लागल्याने शेड पाहण्यासाठी ते वयाच्या ७४ व्या वर्षी नदीवर काठी टेकत आले. पण शेड पाण्याखाली असल्याने ते व्याकुळ झाले होते. कारण  गेले ३४ वर्षे त्या शेड मध्ये वर्षातील आठ महिने राहतात. पावसाळी घरी जातात. मला शेडमधेच शांती मिळते असे सांगत होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Floods Shirala Taluka situation