सांगलीत पंधरवड्यात तीन मोटारी लंपास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

सांगली - सांगली शहर परिसरातून दुचाकी चोरीबरोबर मोटारही लंपास केल्याचे प्रकार दोन आठवड्यांत घडले. पंधरवड्यात एक दोन नव्हे, तर १२ दुचाकींची चोरी झाली. तर घरासमोर लावलेल्या तीन मोटारीही लंपास केल्या गेल्या. तर मोटारीचे सुटे भागही लांबवले. दुचाकी चोरींचा सिलसिला सुरू असतानाच मोटारींचीही चोरी झाल्यामुळे पोलिस चिंतेत पडले आहेत. 

सांगली - सांगली शहर परिसरातून दुचाकी चोरीबरोबर मोटारही लंपास केल्याचे प्रकार दोन आठवड्यांत घडले. पंधरवड्यात एक दोन नव्हे, तर १२ दुचाकींची चोरी झाली. तर घरासमोर लावलेल्या तीन मोटारीही लंपास केल्या गेल्या. तर मोटारीचे सुटे भागही लांबवले. दुचाकी चोरींचा सिलसिला सुरू असतानाच मोटारींचीही चोरी झाल्यामुळे पोलिस चिंतेत पडले आहेत. 

सांगली शहर पोलिस ठाणे हद्दीत तर चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येते. हद्दीत बंद घरे फोडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुकाने फोडण्याचेही प्रकार घडले. त्यात कहर म्हणजे १२ दिवसांत दुचाकी चोरीचे ८ गुन्हे नोंदवले गेले आहेत. कच्च्या नोंदीतील दुचाकी चोरीचे गुन्हे वेगळेच आहेत. शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभाग नुकताच बरखास्त करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाचे काम जवळपास थांबलेच आहे. नव्याते गुन्हे प्रकटीकरण विभाग स्थापन करून चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. विश्रामबाग हद्दीत दोन, तर संजयनगर, सांगली ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक दुचाकी लंपास केली गेली. विश्रामबागला चोरट्याने एका दुचाकीची तर चक्क चाके, सुटे भागच लंपास केले.

दुचाकी चोरींचा सिलसिला सुरू असतानाच घरासमोरून मोटार चोरी होण्याचे तीन गुन्हे दाखल केले गेले. मोटार चोरीचे धाडस चोरटे सहसा करत नाहीत. कारण चोरीची मोटार सहजपणे पकडली जाऊ शकते. परंतु आता मोटारही दारासमोरून लंपास केली तर करायचे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. संजयनगर पोलिस ठाणे हद्दीत कुपवाड रस्त्यावरील विवेकानंद सोसायटीतून आणि उत्कर्षनगर येथून घरासमोरून मोटार लांबवली गेली. दक्षिण शिवाजीनगर येथे सर्व्हिसिंग सेंटरसमोरून नुकतीच मोटार लांबवली गेली. नवीन वसाहत येथून तर मोटारीचे पार्टही लांबवले गेले. तत्पूर्वी डिसेंबर महिन्यातही फार्मसी कॉलेजसमोरून मोटार लंपास केली गेली.

दक्षताही हवी
दुचाकी चोरीचे प्रकार वाढल्यामुळे डबल लॉक किंवा साखळी लावून कुलूप लावण्यासारखे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु मोटारींचे काय? असा प्रश्‍न आहे. नव्या मोटारींना लॉक सिस्टीम, सेन्सरसारखे पर्याय आहेत, परंतु जुन्या मोटारींना ती सुविधा नाही. त्यामुळे चोरट्यांनी जुन्या मोटारी लांबवण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्‍यक वाटू लागले आहे.

Web Title: Sangli fortnight three cars oneself