सांगलीत भाविकांनी केला गणरायाचा जयजयकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

सांगली - शहर आणि परिसरात गणेश जयंती उत्साह व भक्तिमय वातावरणात झाली. गणेश मंदिर आणि सार्वजनिक मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. बहुतंश मंडळांनी महाप्रसाद वाटप केले. 

सांगली - शहर आणि परिसरात गणेश जयंती उत्साह व भक्तिमय वातावरणात झाली. गणेश मंदिर आणि सार्वजनिक मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. बहुतंश मंडळांनी महाप्रसाद वाटप केले. 

सांगलीकरांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी पहाटेपासून रीघ होती. संस्थानच्या गणेश मंदिरात सकाळी दहा वाजता जन्मकाळ झाला. अनिता चिंचपूरकर यांचे कीर्तन झाले. आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. बागेतील श्री गणेश मंदिरातही भक्तांची पहाटेपासून गर्दी होती. जन्मोत्सवानंतर प्रसाद वाटप झाले. भक्तिमय वातावरणात सायंकाळपर्यंत गणेश भक्तांची गर्दी होती. चांदणी चौकातील ओम गणेश मित्रमंडळातर्फे जन्मोत्सव झाला. महाआरतीनंतर परिसरातील भक्तांसाठी महाप्रसाद वाटपही झाले. लक्ष्मण नवलाई यांनी संयोजन केले. 

मिरज-तासगाव रोड रसुलवाडी हद्दीतील श्री स्वयंभू गणेश मंदिरातही धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी बारा वाजता जन्मकाळ, महाआरती झाली. अकरा हजार भाविकांसाठी महाप्रसाद वाटप झाले. स्वयंभू गणेश मंदिरात जयंतीचे अकरावे वर्ष आहे. पुजारी अप्पासाहेब कुंभार यांच्या हस्ते महाआरती झाली. दुपारी दिलीप सुतार व इचलकरंजी येथील महिला सहकारी ग्रुपतर्फे भजनांचा कार्यक्रम झाला. लायन्स नॅबतर्फे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, रक्तदान झाले. कवलापूरसह रसुलवाडी, कांचनपूर, काकडवाडी, मानमोडी, कानडवाडीसह पंचक्रोशीतील भक्त उपस्थित होते. इनाम धामणी (ता. मिरज) येथील हिंदविजय मंडळातर्फे गेल्या तीन दिवसांपासून धार्मिक कार्यक्रम झाले.

Web Title: sangli ganesh jayanti