
कृषी विधेयके रद्द करा, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घ्यायला केंद्र सरकार तयार नाही. उलट आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
सांगली : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शनिवारी इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आहे. सांगली इस्लामपूर रस्त्यावर रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. समन्वयक महेश खराडे, डाॕ.संजय पाटील, उमेश देशमुग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
खराडे म्हणाले की, कृषी विधेयके रद्द करा, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घ्यायला केंद्र सरकार तयार नाही. उलट आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
आंदोलनात शंभरहून अधिक शेतकरी बळी गेले. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनच केंद्र सरकारला पायउतार व्हावे लागेल. देशातील शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी "चक्का जाम'ची हाक दिली आहे. त्या आंदोलनाचा सहभाग म्हणून विविध शेतकरी संघटनांनी लक्ष्मी फाटा, इस्लामपूर, शिरढोण, म्हैसाळ येथे रस्ता रोको आंदोलन केले. रघुनाथराव पाटील, महादेव कोरे, राजू कवठेकर, आदी सहभागी झाले.
संपादन- अर्चना बनगे