सांगली ते जगन्नाथपुरी चक्क सायकलवरुन ! 

महेश भिसे
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

  • निसर्गाच्या सानिध्यात रहात 'सायकल चालवा,पर्यावरण वाचवा', 'इंधन वाचवा', 'तंदरुस्त राहा', एक भारत श्रेष्ठ भारत',' बेटी बचाओ ,बेटी पाढाओ','असे सामाजिक संदेश देत भ्रमंती
  • 'आपला देश पाहणं आणि समजावून घेणं' हा सायकल भ्रमंतीचा मुख्य उद्देश

बुधगाव - सांगलीतील सहयाद्री ट्रॅकर्स ग्रुपने सांगली ते जगन्नाथपुरी सोळाशे किलोमीटरचा सायकलने प्रवास केला. निसर्गाच्या सानिध्यात रहात 'सायकल चालवा,पर्यावरण वाचवा', 'इंधन वाचवा', 'तंदरुस्त राहा', एक भारत श्रेष्ठ भारत',' बेटी बचाओ ,बेटी पाढाओ','असे सामाजिक संदेश देत भ्रमंती केली . 
या भ्रमंतीमध्ये सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुनील कुलकर्णी, शिवाजी कणसे, अनिल कुलकर्णी, विजय वरडे, राजेंद्र आवळकर, किशोर माने, अंबरीश जोशी, सागर माळवदे, मिलिंद कुलकर्णी, राहुल बाबर आदी सहभागी झाले होते. 

'आपला देश पाहणं आणि समजावून घेणं' हा सायकल भ्रमंतीचा मुख्य उद्देश होता. सांगली, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर, नळदुर्ग, सास्तापूर, जहीरबाद, हैदराबाद, विजयवाडा, राजमुंद्री, विशाखापट्टणम,  इच्छापूरम, छत्रपूर, पलूर, मालूद, जान्हीकुडा, सातपाडा, ब्रम्हगिरी, जगन्नाथपुरी असा रोज ते किलोमीटरचा प्रवास करत दिवसात पूर्ण केला. 

यापुढेही असे उपक्रम या ग्रुपच्यावतीने राबविण्यात येणार आहेत,  अशी भावना या ग्रुपने व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli to Jagannathpuri on bicycle