सांगली : आवाडेंसह २४ मान्यवरांचा जैन सभेकडून गौरव

दिवंगत बापूसाहेब बोरगावे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
सांगली : आवाडेंसह २४ मान्यवरांचा जैन सभेकडून गौरव

सांगली : सहकारमहर्षी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह चोवीस मान्यवरांचा दक्षिण भारत जैन सभेच्या शताब्दी महाअधिवेशनात आज गौरव करण्यात आला. श्री. आवाडे यांना कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्काराने, तर दिवंगत बापूसाहेब बोरगावे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. रोख एक लाख रुपये व मानचिन्ह असे त्याचे स्वरूप होते.

बी. बी. पाटील समाजसेवा पुरस्कार प्रा. आप्पासाहेब मासुले (कसबे डिग्रज), पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवडी समाजसेवा पुरस्कार छाया पाटील (कामेरी), आचार्य कुंदकुंद प्राकृत ग्रंथ संशोधन व लेखन पुरस्कार डॉ. सी. पी. कुसुमा (श्रवणबेळगोळ), आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार प्रा. श्रीधर हेरवाडे (कोल्हापूर), आचार्य बाहुबली कन्नड साहित्य पुरस्कार मोहन शास्त्री (म्हैसूर) यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. डी. एस. बरगाले समाजसेवा पुरस्कार डॉ. विजय पाटील (सोलापूर), श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी आदर्श संस्था पुरस्कार सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था (कवठेएकंद), प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार कुंतिनाथ कलमणी (बेळगाव), प्रा. डी. ए. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार अरूणा चौगुले (मौजे डिग्रज), बाळ पाटील सोशल कल्चरल अवेअरनेस अॅवॉर्ड डॉ. अजित मुरगुंडे (बंगळूर), सुलोचना सि. चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार काव्यश्री नलवडे (जयसिंगपूर), दानोळी श्रमणरत्न आचार्यश्री १०८ सुबलसागर महाराज त्यागी सेवा श्रावक पुरस्कार सुहास पाटील (बोलवाड), श्रीमती धन्नाबाई गंगवाल त्यागी सेवा महिला पुरस्कार शोभा सुंदरलालजी पाटणी (जालना), डॉ. एन. जे. पाटील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दादासाहेब पाटील (दुधगाव), प्रेमाबाई जैन आदर्श माता पुरस्कार आक्काताई बेळकुडे (जयसिंगपूर), चंपतराय अजमेरा युवा पुरस्कार मोहन नवले (अंकलखोप), सावित्रीबाई राघोबा रोटे आदर्श युवती पुरस्कार सुप्रिया पाटील (पेठ वडगाव) यांना प्रदान करण्यात आला. स्व. वालुबाई शिवलाल शहा प्राणीमित्र पुरस्कार यशवंत सुर्वे (बैरागवाडी), विशेष सेवा पुरस्कार कुलभूषण बिरनाळे (अब्दुललाट) यांनी दिला.

दोन लाख देणगी...

कर्नाटकातील दिवंगत बापूसाहेब बोरगावे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या चिरंजीवानी हा गौरव स्विकारला. रोख एक लाख रुपये, मानचिन्ह असे स्वरुप होते. त्यांनी या एक लाखाच्या पुरस्कारात आणखी एक लाखाची भर घालून दोन लाख रुपयांची देणगी जैन सभेच्या शिष्यवृत्ती निधीसाठी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com