सांगली बाजार समितीला यांनी ठोकळे टाळे

sangli market committi locked by tolaidar
sangli market committi locked by tolaidar

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई मजुरीसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या 23 व्या दिवशी समितीच्या मुख्य गेटला टाळे ठोकण्यात आले. सुमारे अडीच तासानंतर सभापती दिनकर पाटील घटनास्थळी आले. 115 व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटीसीची मुदत पाच दिवसानंतर संपत आहे. तो पर्यंत त्यांनी प्रतिसाद दिला नाहीतर व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले जातील असे आश्‍वासन दिले. त्यानंतर टाळे काढण्यात आले. 


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात 82 तोलाईदार कार्यरत आहेत. 16 डिसेंबर 2014 ला इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काट्यावर वजनमापे करताना तोलाई कपात करू नये असे आदेश पणन संचालकांनी दिले. तोलाईदारांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर 22 डिसेंबर 2014 मध्ये स्थगिती दिली. त्यामुळे चेंबर ऑफ कॉमर्स आणि काही व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तिथे 16 डिसेंबरचा आदेश राज्यासाठी लागू केला. तोलाईदार सभेने आदेशाविरूद्ध दाद मागितली. तेव्हा शासनाकडे निर्णय सोपवला गेला. शासनाने एक डिसेंबर 2018 रोजी 16 डिसेंबरचा आदेश लागू केला. डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण केल्यानंतर 19 सप्टेंबर 2019 रोजी 16 डिसेंबरच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे 3 ऑक्‍टोबरपासून तोलाईदार कामावर जाऊ लागले. परंतू तीन महिने तोलाई माथाडी मंडळाकडे जमा न केल्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 


दोन दिवसापूर्वी हमाल संचालक बाळासाहेब बंडगर यांनी संतप्त होत बाजार समितीला शुक्रवारी टाळे ठोकण्याचा इशारा दिला. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने तातडीने सायंकाळी 115 व्यापाऱ्यांना नोटीसा पाठवल्या. त्यानंतर आज ठरल्याप्रमाणे तोलाईदार सभेने बाजार समितीच्या लोखंडी गेटला टाळे ठोकून जोरदार घोषणाबाजी केली. समितीच्या कर्मचाऱ्यांना आत जाण्यापासून रोखले. दोन ते अडीच तास टाळे ठोकून तोलाईदारांनी गेटसमोरच ठिय्या धरला. बंदोबस्तासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. ठोस आश्‍वासन मिळाल्याशिवाय माघार नाही असा पवित्रा घेतला. 


दरम्यान टाळे ठोकल्याची माहिती मिळाल्यानंतर सभापती दिनकर पाटील घटनास्थळी आले. त्यानी तोलाईदारांचे म्हणणे ऐकून घेतले. ते म्हणाले,"" व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटीसीची मुदत संपण्यास अद्याप पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करूया. त्यांनी प्रतिसाद दिला नाहीतर परवाने निलंबित केले जातील.'' 
सभापती पाटील यांच्या आश्‍वासनानंतर टाळे काढून धरणे आंदोलन सुरूच ठेवले. 


हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम, संचालक बाळासाहेब बंडगर, संजय मोरे, गोविंद सावंत, श्रीमंत बंडगर, प्रकाश बाबर, विठ्ठल यमगर, महादेव रूपनर, पुंडलिक घोडके, माणिक तुपलोंढे, दिगंबर तुपलोंढे, राघू बंडगर, शामराव माने, धोंडिराम माने आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com