सांगली बाजारपेठेत गुळ प्रति क्विंटल 5500 रूपये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

सांगली - सांगलीत आलेल्या महापुरामुळे तसेच बरेच रस्ते
पाण्याखाली गेल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बरीच आवक ठप्प होती. पूर ओसरल्यानंतर आवक सुरू झाली असून गुळ व बेदाणा सौद्यांना आज प्रारंभ झाला. आजच्या गुळाच्या सौद्यामध्ये प्रति क्विंटल 5500 रूपये असा उच्चांकी दर मिळाला.

सांगली - सांगलीत आलेल्या महापुरामुळे तसेच बरेच रस्ते
पाण्याखाली गेल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बरीच आवक ठप्प होती. पूर ओसरल्यानंतर आवक सुरू झाली असून गुळ व बेदाणा सौद्यांना आज प्रारंभ झाला. आजच्या गुळाच्या सौद्यामध्ये प्रति क्विंटल 5500 रूपये असा उच्चांकी दर मिळाला.

निम्मी सांगली महापुरात गेले आठवडाभर बुडाली होती. तसेच सांगलीच्या आसपासची गावे देखील पुराने वेढली गेली होती. सांगलीत येणारे पूर्वेकडील आणि उत्तरेकडील मार्ग सोडले तर इतर मार्ग बंदच होते. काही व्यापारी आणि हमालांची घरे देखील पाण्याखाली गेली. आवक बंद असल्यामुळे मार्केट यार्डातील तुरळक प्रमाणात व्यवहार सुरू होते. सौदे बंदच होते. महापुराचा
मार्केट यार्डातील व्यापाराला देखील चांगलाच फटका बसला. कोट्यवधी रूपयाची उलाढाल ठप्प झाली.

दोन-तीन दिवसापासून पुराचे पारी ओसरू लागल्यानंतर मार्केट यार्डातही हळूहळू उलाढाल सुरू झाली आहे. त्यामुळे गुळ आणि बेदाणा सौदे आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी गुळाचे सौदे सुरू झाले. मेसर्स मगदूम व लठ्ठे पेढीमध्ये झालेल्या गुळाच्या सौद्यात कर्नाटकातील प्रगतशील शेतकरी
करीगार अशोक मलकारी (रा. निडगुंदी ता. रायबाग) यांच्या गुळाला प्रति क्विंटल 5500 रूपये दर मिळाला. मे. महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीने हा गुळ खरेदी केला.

दरम्यान मार्केट यार्डातील सौदे पूर्ववत सुरू झाले असून गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी गुळ विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा असे आवाहन सभापती दिनकर पाटील व प्रभारी सचिव व्ही. जे. राजशिर्के यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Sangli market, Jaggery cost Rs 5500 per quintal