esakal | सांगली पालिकेची कारवाई; मार्केट यार्डातील 7 व्यापाऱ्यांना दंड

बोलून बातमी शोधा

सांगली पालिकेची कारवाई; मार्केट यार्डातील 7 व्यापाऱ्यांना दंड
सांगली पालिकेची कारवाई; मार्केट यार्डातील 7 व्यापाऱ्यांना दंड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली शहर (Sangli City) आणि विश्रामबाग परिसरात कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या मार्केट यार्डातील (Sangli Market Yard) सात दुकानांवर उपायुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने कारवाई करीत 45 हजाराचा दंड (fine) वसूल केला. महापालिका (Sangli Munciple Corporation) आयुक्तांनी बाजार समिती व्यवस्थापनालाही नोटीस बजावण्यास सांगितले. पालिकेने पुढील आठ दिवसातील जनता टाळेबंदीतही (Sangli Lockdown) ही दंडात्मक मोहिम सुरु राहील असे सांगितले.

सकाळी 11 नंतर विश्रामबाग आणि मार्केट यार्डात आस्थापना सुरू होत्या. प्रभाग समिती 2 च्या कार्यक्षेत्रात पथकासह फिरून सात आस्थापनेवर कारवाई केली. यातून 45 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या (Sangli Police Station) मदतीने महापालिकेने शहरात कारवाई केली आहे. याचबरोबर मार्केट यार्डात 11 नंतर सुद्धा व्यापारी पेठा सुरू राहिल्याने आणि गर्दीला कारणीभूत ठरल्याबद्दल मार्केट कमिटीला नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे.

हेही वाचा: अँटिजेनचा बनवाट अहवाल देणारा गजाआड; गुन्हे अन्वेषणची धडक कारवाई

कारवाईत सहायक आयुक्त एस एस खरात, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, पंकज गोंधळे, प्रमोद कांबळे, प्रमोद रजपूत, चंदू जाधव, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, अकबर खाताल, सतीश वगरे आदी पोलिस स्टाफही सहभागी होता.