सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी 100 कोटी देणार : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेसाठी 100 कोटींचे विशेष अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. येथील आमराई क्लबमधी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी मोबाईल संवाद साधला.

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेसाठी 100 कोटींचे विशेष अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. येथील आमराई क्लबमधी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी मोबाईल संवाद साधला.

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख,मकरंद देशपांडे ,शेखर इमानदार आदींसह भाजप नेते उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यावेळेस ध्वनीक्षेपक मोठा करून मुख्यमंत्र्यांशी सर्व नगरसेवकांचा संवाद घडवला. मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी देण्याची घोषणा करतानाच लवकरच सांगली दौरा करू असे अाश्वासन  दिले.

Web Title: For Sangli Miraj Kupwad Municipal Corporation will provide 100 crores says Chief Minister