खो - खो संघटना निवडी सांगली, मिरजेला डावलले :  शहरी-ग्रामीण खेळ रंगला

Sangli, Mirza left in Kho-Kho organization selection
Sangli, Mirza left in Kho-Kho organization selection

सांगली : जिल्हा खो-खो संघटनेचे नेतृत्व एकेकाळी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, प्राचार्य पी. बी. पाटील यांनी केले. सन 2005 पासून सांगली जिल्ह्याने राज्यात नव्हे तर देशात खो-खो मध्ये दबदबा निर्माण केला आहे. परंतू या खेळाच्या संघटनेत अलीकडे राजकारण घुसले आहे. नुकतेच संघटनेची निवडणूक बिनविरोध जाहीर केली. त्यात बोरगाव, कवठेपिरान, विटा, मांगरूळ, भडकंबे, आष्टा येथील पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. त्याचवेळी सांगली, कुपवाड, मिरज या शहरी भागासह वाळव्याला डावलले गेले. त्यामुळे शहरी-ग्रामीण असा खेळ सुरू झाला आहे. तो थांबवला जावा, अशी क्रीडाप्रेमींची मागणी आहे.

संस्थापक डी. जे. चिप्रीकर असलेल्या जिल्हा खो-खो संघटनेची स्थापना सन 1984 मध्ये झाली. दिवंगत राजा स्वामी पहिले सचिव होते. क्रांतीवीर नागनाथअण्णा, प्राचार्य पी. बी. पाटील, शामराव कदम यांनी संघटनेचे सुरवातीला अध्यक्षपद भूषवले. नगरसेवक हणमंत पवार दहा वर्षे अध्यक्ष होते. सन 2005 पासून बोरगावचे माणिक पाटील अध्यक्ष होते. सन 2015 मध्ये जिल्हा ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशन असे नामकरण झाले. बिनविरोध निवडणूक होऊन अध्यक्षपदी भीमराव माने यांची निवड झाल्याचे जाहीर केले. 15 जागांसाठी 15 अर्ज दाखल होऊन निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगितले. 

विद्यमान कार्यकारिणीत बोरगाव, कवठेपिरान, विटा, मांगरूळ, कार्वे, भडकंबे, आष्टा येथील लोकांना प्रतिनिधीत्व दिले आहे. सांगली, कुपवाड, मिरज या शहरी भागासह वाळवा भागाला संघटनेत प्रतिनिधीत्व दिलेले नाही. वास्तविक ही संघटना आहे.

शहरी व ग्रामीण असा भेद न करता सर्व क्‍लब, संस्थांना प्रतिनिधीत्व देणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. आर्थिक संघटनेप्रमाणे येथे खेळ सुरू झाला आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे. खेळाचा प्रचार, प्रसार व्हायचा तर जिथे खेळ तिथे प्रतिनिधीत्व देणे आवश्‍यक आहे. राजकारण बाजूला ठेवून खेळाला प्राधान्य देण्यासाठी सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व देण्याची मागणी होत आहे. 

वेट ऍन्ड वॉचची भूमिका 

संघटनेत शहरी व ग्रामीण असा खेळ सुरू झाल्याबद्दल एक नूतन पदाधिकारी व माजी पदाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी संघटना सर्वसमावेशक असावी असेच मत व्यक्त केले. बदलाबाबत "वेट ऍन्ड वॉच'ची अशी भूमिका व्यक्त केली. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com