निकालाच्या उत्सुकतेने सगळी सांगली ऑनलाईन!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे निकाल मिळवण्यासाठी सारी सांगली सध्या ऑनलाईन आहे. पहिल्या फेरीचा कल हाती येत असताना धडाधड संदेश फिरू लागले आहेत. प्रचंड चुरशीने मतदान झाले असून वेगवेगळे आणि काहीसे धक्कादायक कल हाती यायला लागले आहेत. 

व्हॉट्सअॅपवर अनेकांनी वेगवेगळे ग्रुप करून निकाल टाकण्याला सुरवात केली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर काही हजार कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे. क्रीडा संकुलाच्या परिसराला वाहन तळाचे स्वरुप आले आहे.

सारी तरुणाई सध्या मोबाईलवर गुंतली असून निकालाचे अपडेट एकमेकांना पुरवण्याची झटापट सुरु झाली आहे. अनेक पक्षाच्या नेत्यांनी ठिकठिकाणी तळ ठोकला असून सारे टीव्हीपुढे बसून आहेत. 

दुपारी दीड वाजता भाजपकडे 23, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 22 जागांवर आघाडी होती. अनेक ठिकाणी भाजपने छोटी, मात्र अनपेक्षित आघाडी घेतली आहे. त्यामुळे रंगत वाढत निघाली आहे. पहिल्या टप्प्यात मिरज शहरातील कल हाती येत असल्याने मिरज शहरात धाकधूक वाढली आहे.

Web Title: Sangli Municipal Corporation election results online