सांगली महानगरपालिकेची वसुली साडेसात कोटींची 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

सांगली - महापालिकेचा विविध कर भरण्यासाठी चलनबाह्य झालेल्या नोटा स्वीकारत असल्यामुळे नागरिकांनी रांगा लावून कर भरला. आज रविवारचा सुटीचा दिवस असल्याने सातही केंद्रांवर कर भरणा करण्यासाठी गर्दी होती. आज दीड कोटींची वसुली झाली आहे. तीन दिवसांत साडेसात कोटींची विक्रमी वसुली झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. जुन्या नोटांतून कर भरणा करण्यासाठी उद्या (ता.14) शेवटची संधी असल्याने नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

राज्यातील महापालिकांची थकीत कर वसुली करण्यासाठी जुन्या नोटा स्वीकाराव्यात, असा आदेश आला. एक दिवसांत चार कोटींची वसुली झाल्यानंतर पुन्हा तीन दिवस वाढविण्यात आले. महापालिकेकडून शहरात सात ठिकाणी कर भरणा केंद्रे उभारण्यात आलीत. दररोज ध्वनिक्षेपकाद्वारे कर भरण्यासंदर्भात शहरातील नागरिकांना आवाहन केले जाते आहे. त्याला बहुतांश करदात्यांनी प्रतिसाद दिल्याने विक्रमी कर वसुली झाली आहे. 

सकाळपासून कर भरण्यासाठी नागरिकांनी केंद्रांवर गर्दी केली होती. घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता, नगररचना विभागाचे विविध कर नागरिकांनी भरले. ज्यांना आठ नोव्हेंबरपूर्वी कर भरण्यासंदर्भातील मागणीपत्र प्राप्त झाले, त्यांनाच ही सुविधा देण्यात आली. त्यातील संपूर्ण रक्कम भरणे अपेक्षित असल्याने आज सायंकाळी सहापर्यंत दीड कोटींची वसुली झाली. तर तीन दिवसांत हा आकडा साडेसात कोटींवर गेला. उद्यापर्यंत दहा कोटींची वसुली होईल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला गेला आहे. रात्री आठपर्यंत कर भरणा केंद्रे सुरू होती. 

50 लाखांची एलबीटी 

महापालिका क्षेत्रात व्यापाऱ्यांकडून शंभर कोटींवर एलबीटी थकीत आहे. तोही यानिमित्ताने वसूल होत आहे. पहिल्या दिवशी 16 लाख 38 हजार रुपयांचा एलबीटी वसूल झाला होता. आज मोठा प्रतिसाद मिळाला. 50 लाख रुपयांचा विक्रमी एलबीटी जमा झाला.

Web Title: Sangli Municipal Corporation recoveries, five crore