थापाड्यांच्या हाती भवितव्य देऊ नका - विश्‍वजित कदम

सांगली - शहरातील विविध प्रभागांत आमदार विश्‍वजित कदम, प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील यांनी प्रचार फेरी काढली.
सांगली - शहरातील विविध प्रभागांत आमदार विश्‍वजित कदम, प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील यांनी प्रचार फेरी काढली.

सांगली - शहराचे भवितव्य थापाड्यांच्या हाती द्यायचे की काम करणाऱ्यांच्या याचा फैसला नागरिकांना करायचा आहे असे मत आमदार विश्‍वजित कदम यांनी येथे व्यक्त केले. काँग्रेस नेते प्रतीक पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी आज ठिकठिकाणी प्रचार फेऱ्या, कोपरा सभा करीत आज प्रचाराचे रान उठवले. 

श्री. कदम म्हणाले, ‘‘पालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत अनेक विकासकामे झाली. राज्य सरकारने विविध योजनांची अडवणूकच केली. आता तीच मंडळी विकासाच्या पॅकेजच्या थापा मारत आहेत. तुमचे भवितव्य थापाड्यांच्या हाती देऊ नका. शहराचं भवितव्य कोणाच्या ताब्यात द्यायचे हे जनताच 
ठरवणार आहे. भाजपच्या भूलथापा आता चालणार नाहीत. पुन्हा आघाडीलाच जनता साथ देईल.’’

काँग्रेस पक्षातर्फे आज बदाम चौक परिसरात फेरी काढण्यात आली. सिद्धार्थ परिसरात कोपरा सभा झाली. विश्रामाबागमधील वृंदावन कॉलनी, अभिनंदन कॉलनी सभा झाली. शहरभर नेत्यांची धावाधाव सुरू होती. नेत्या जयश्री पाटील म्हणाल्या, ‘‘आम्ही काम केले आणि मग जनतेसमोर येत आहोत. अजूनही या शहराचे प्रश्‍न शिल्लक आहेत. ते आम्ही पुढील पाच वर्षांत सोडवू.’’

या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रभारी प्रकाश सातपुते, विशाल पाटील, बिपीन कदम उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com